शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

अकोला शहरावर डेंग्यूचे सावट ; तीन संशयीत रुग्ण आढळले!

By atul.jaiswal | Updated: July 7, 2018 13:46 IST

अकोला : पावसाळा सुरू होताच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, कीटकजन्य आजारांनी डोके वर काढले आहे.

ठळक मुद्देशहरातील ९० टक्के कूलरच्या पाण्यामध्ये डेंग्यू या जीवघेण्या आजारास कारणीभूत असलेल्या एडिस एजिप्टा डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. डेंग्यूसदृश आजाराचे तीन संशयीत रुग्णही आढळून आल्याने शहरावर डेंग्यूचे सावट असल्याचे संकेत मिळाले आहेत.नागरी हिवताप योजनेंतर्गत संपूर्ण जुलै महिना डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत आहे.

अकोला : पावसाळा सुरू होताच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, कीटकजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या कंटेनर सर्वेक्षणात पहिल्या पाच दिवसांतच शहरातील ९० टक्के कूलरच्या पाण्यामध्ये डेंग्यू या जीवघेण्या आजारास कारणीभूत असलेल्या एडिस एजिप्टा डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत, तसेच डेंग्यूसदृश आजाराचे तीन संशयीत रुग्णही आढळून आल्याने शहरावर डेंग्यूचे सावट असल्याचे संकेत मिळाले आहेत.नागरी हिवताप योजनेंतर्गत संपूर्ण जुलै महिना डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत मनपाच्या आरोग्य विभागाने ३० जूनपासूनच शहरातील विविध भागांमध्ये कंटेनर सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी पाच पर्यवेक्षकांना कामाला लावले असून, त्यांच्या मदतीला मनपाचे आरोग्य कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी आळशी प्लॉट, राजपूतपुरा, शिक्षक कॉलनी, मलकापूर, व्हीएचबी कॉलनी, शिवाजी नगर, इंदिरा नगर, अकोट फैल, नायगाव आदी भागांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ९० टक्के कूलरच्या पाण्यामध्ये एडिस एजिप्टा या डेंग्यूसाठी कारणीभूत असलेल्या डासांच्या अळ्या आढळून आल्या, तसेच या सर्वेक्षणादरम्यान गुलजारपुरा भागात डेंग्यूसदृश आजाराचे दोन तर नायगाव परिसरात १ असे एकूण तीन रुग्ण आढळून आले. या रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले असून, या परिसरात फॉगिंग मशीनद्वारे धुरळणी करण्यात आली आहे.अशी होते डेंग्यूची लागणस्वच्छ, साचलेल्या पाण्यात अंडी घालणारा एडीस एजिप्टा हा डास डेंग्यूचे विषाणू पसरवतो. हे डास शक्यतो सकाळी व संध्याकाळी चावतात. पावसाळ्यानंतर तापमानात होत असलेल्या चढ-उतारांमध्ये डेंग्यूच्या विषाणूंची संख्या वाढते आणि त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढते. डासांनी वहन करून आणलेल्या विषाणूंशी लढण्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडली की, डेंग्यूची लागण होते.लक्षणेतीव्र स्वरुपाचा ताप, तीव्र डोकेदुखी, सांधे दुखी, अंग दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, रक्तमिश्रीत शौचास होणे, रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे आदी लक्षणे आढळून येतात.साठलेले पाणी वाहते करा!घरात पाण्याचा साठा केल्यास या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाणी साचून त्यात हे डास वाढतात. कूलरच्या पाण्यातही हे डास वाढू शकतात. घर व परिसरात डास होणार नाहीत, याची काळजी घेतल्यास डेंग्यू व मलेरिया या आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून डासांच्या उत्पत्तीला अटकाव करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.सर्वेक्षणादरम्यान कूलरच्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. साठलेले पाणी हे डेंग्यूच्या डासाचे मुख्य उत्पत्तीस्थळ आहे. त्यामुळे साठलेले पाणी वाहते करणे गरजेचे आहे. कूलरच्या पाण्यात मोटारसायकलचे आॅईल टाकल्यास आॅक्सिजन न मिळाल्याने डासांच्या अळ्यांचा नायनाट होतो.

- डॉ. फारुख शेख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाdengueडेंग्यूAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका