शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिमीटरची मागणी वाढली; सॅनिटायझरची घटली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:58 IST

रीराचे तापमान आणि आॅक्सिजनचा स्तर मोजण्यासाठी लोकांकडून थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) आणि पल्स आॅक्सिमीटरची मागणी वाढली आहे.

अकोल : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे धास्तावलेल्या अकोलेकरांनी काळजीपोटी आॅक्सिमीटर घेण्याकडे कल वाढविला आहे. त्यामुळे बाजारात आॅक्सिमीटरची मागणी वाढली आहे दुसरीकडे सॅनिटायझरची मागणी आश्चर्यकारकरीत्या कमी झाल्याचे चित्र दवा बाजारात आहे.अकोल्यात सौम्य लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा रुग्णांच्या शरीराचे तापमान आणि आॅक्सिजनचा स्तर मोजण्यासाठी लोकांकडून थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) आणि पल्स आॅक्सिमीटरची मागणी वाढली आहे.कोरोनापूर्वी केवळ रुग्णालयांकडूनच खरेदी केले जाणारे आॅक्सिमीटर आता तुलनात्मकरीत्या पूर्वीपेक्षा जास्त विकले जात आहेत. लोकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता वाढल्याने या उपकरणांची विक्री वाढल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले.कोरोना रुग्णाव्यतिरिक्त कोरोना नसलेले लोकही घरी तापमान आणि आॅक्सिजन स्तर मोजण्यासाठी या दोन्ही उपकरणांची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात थर्मल स्कॅनर व मास्कची मागणी वाढली होती. आता ही मागणी आश्चर्यकारक घटली आहे.ही दोन्ही उपकरणे फार्मासह नॉन फार्मा दुकानांमध्येही विक्रीस आहेत. विशेष म्हणजे उपलब्धता वाढल्याने या उपकरणांच्या किमती कमी झाल्या आहेत. पूर्वी ही उपकरणे चीनमधून आयात व्हायची; पण आता भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे.मास्कचीही मागणी घटलीमार्च ते मे या तीन महिन्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात होती. एन-९५, ट्रिपल लेअर यासोबतच कापडी मास्कचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. आता मात्र मास्कची मागणी घटली आहे. अनेक नागरिकांचा घरगुती मास्कचा वापर करण्याकडे कल वाढला असल्यानेही या मागणीत घट आली आहे. आॅक्सिजन स्तर मोजण्यासाठी पल्स आॅक्सिमीटरची खरेदी पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे, तसेच या उपकरणांचा पुरवठाही वाढला असल्याने कुठेही तुटवडा नाही.- प्रकाश सावंल, औषध विक्रेते. किमतीही घटल्याकोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आॅक्सिमीटरची किंमत ही जास्त होती. त्यावेळी वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होता. परिणामी, या उपकरणाची ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत विक्री झाली होती; पण आता हेच उपकरण विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादीत केले आहे, त्यामुळे ५०० रुपयांपासून सहज उपलब्ध होत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला