राष्ट्रीय एकता सेनेने दिलेल्या निवेदनानुसार, अकोला नाका-खामगावकडे जाणाऱ्या बायपास पर्यंत १२०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल, परंतु दुतर्फा सांडपाणी वाहण्यासाठी नाल्या बांधल्या नसल्याने घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. खामगाव नाका-महेश नदी पुलापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या घरातील सांडपाणी, नळाचे पाणी, वाहण्यासाठी नाल्या नसल्याने सांडपाणी नव्यानेच झालेल्या डांबरीकरणाच्या रस्त्यावर वाहत असल्याने अनेक दुचाकीस्वार घसरुन जखमी झालेले आहेत. पावसाळ्यातील पाणी व सांडपाणी महामार्गावर साचून महामार्गाला खड्डे पडत आहेत. त्यामुळे अकोला नाका-खामगाव नाक्यापर्यंत दुतर्फा सांडपाणी वाहणाऱ्या नाल्या सार्वजनिक बांधकाम विभाग किवा नगरपरिषदेने तत्काळ बांधून देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी डाॅ. रामेश्वर पुरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर राष्ट्रीय एकता सेनेचे रिजवान कुरेशी, शेख जावेद, मोईन शहा, अफजल कुरेशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महामार्गाला दुतर्फा नाल्या बांधण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:19 IST