शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या पणत्यांची मागणी घटली!

By admin | Updated: October 21, 2014 23:03 IST

टेराकोटाच्या पणत्यांकडे ग्राहकांचा कल; परराज्यातील पणत्यांची कुंभारांकडून विक्री.

वाशिम: दिपोत्सवात मातीच्या पणत्यांना महत्वाचे स्थान असते. काळाच्या ओघात या पणत्यांचे महत्व ओसरले आहे. मातीच्या पणत्यांची मागणी कमी होत असल्याने, पणत्या बनविणार्‍या कुंभारांची संख्याही कमी होत आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील कुंभार आता पणत्या स्वत: बनविण्याऐवजी परराज्यातील व्यापार्‍यांकडून तयार पणत्या घेऊन, त्या विकण्याच्या व्यवसायाकडे वळले आहेत.दिवाळीनिमित्त पणत्या, महालक्ष्मीच्या मुर्त्या, मापलं, खेळभांडी तयार करण्याचे काम कुंभार करतात. कुंभार समाजाच्या या परंपरागत व्यवसायावर हळूहळू कोलकाताच्या व्यापार्‍यांनी अतिक्रमण केले. आता काही मोजके कुंभार वगळता, बहुतेकांनी पणत्या बनविणे बंद केले आहे. कोलकाता येथील टेराकोटाच्या पणत्या बाजारात येण्यापूर्वी एक कुंभार जवळपास ५0 हजार पणत्या बनवायचा. आता हे कुंभार कोलकाताच्या व्यापार्‍यांकडून ५00 रूपये प्रति हजार या भावाने टेराकोटाच्या पणत्या विकत घेतात. नंतर याच पणत्या ते बाजारपेठेत ९00 रूपये प्रति हजार या भावाने विकतात. कुंभारांनी हाताने घडविलेल्या पणत्यांपेक्षा टेराकोटाच्या पणत्या आकर्षक असतात. त्यामुळे या पणत्यांना जास्त मागणी असते. त्यामुळे कुंभार तयार पणत्या विकण्याच्या व्यवसायाकडे मोठय़ा प्रमाणात वळले आहेत.टेराकोटाच्या पणत्या आम्ही बनविलेल्या पणत्यांपेक्षा जास्त आकर्षक असतात. त्यामुळे मातीच्या पणत्या ग्राहक खरेदी करणे सहसा टाळतात. त्यामुळे आम्ही कोलकाताच्या व्यापार्‍यांकडून थोक भावात पणत्या विकत घेऊन, त्यांची किरकोळ विक्री करतो, असे वाशिम येथील कुंभारगल्लीतील एका कुंभाराने सांगितले.