शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 13:55 IST

शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कृषी क्षेत्रातील अद्ययावत विज्ञान व तंत्रज्ञानासाठी आग्रही असलेल्या शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली.शेतकरी संघटनेचे मुख्य प्रवक्ते ललित बाहाळे यांनी १० जून रोजी दोन एकर क्षेत्रात प्रतिबंधित एचटीबीटी कापूस पेरून सत्याग्रहाची सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन जाहीररीत्या प्रतिबंधित कापसाची पेरणी केली. या किसान सत्याग्रहात दोन घटनांमध्ये निवडक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या पृष्ठभूमीवर शेतकरी संघटनेने काही प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केले. यामध्ये सर्व नियामक चाचणी पूर्ण झालेल्या बीटी वांग्यावरील बंदी तत्काळ उठवावी, जीएम मोहरीला मान्यता देण्याची प्रक्रिया जलद करण्यात यावी, अनधिकृत बियाणे कोणीही प्रमाणित करीत नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांची फसवणूक होत आहे. याला शासनाने घातलेली बंदी जबाबदार आहे. कोणत्याही कारणासाठी सरकारने शेतकºयांच्या पिकांचा ताबा घेऊन पीक नष्ट केल्यास त्याला नुकसान भरपाई द्यावी, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी शेतकºयांना पूर्वकल्पना देण्यात यावी, भारतातील तंत्रज्ञान नियंत्रक व्यवस्था विशेष करून जनुकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील नियंत्रण व्यवस्था सुलभ करण्यात यावी, कृषी मंत्रालयाने कापूस दर नियंत्रण किंवा त्यामधील रॉयल्टी ठरविण्याचे अधिकार सोडून द्यावे, आदी प्रस्ताव यावेळी मुख्यमंत्र्यांपुढे सादर केले. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळात ललित बाहाळे, शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष गुणवंत हंगरगेकर, सोशल मीडिया राज्य प्रमुख विलास ताथोड, विजय निवल, नितीन देशमुख, श्रीकांत डहवार, अकोला जिल्हा माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी