शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या वेतनाला विलंब; बीईओंना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:18 IST

शिक्षकांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सर्वच पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.

अकोला : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या वेतनासाठी शालार्थ प्रणालीमधील ठरलेली प्रक्रिया दरमहा २० तारखेपर्यंत पूर्ण होत नाही. त्यामुळे देयके कोषागारात सादर न झाल्याने वेतनाला विलंब होत आहे. यापुढे शिक्षकांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सर्वच पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.दरमहा ५ तारखेला वेतन मिळावे, यासाठी शिक्षकांनी सातत्याने मागणी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आश्वासही दिले. विशेष म्हणजे, शिक्षकांचे वेतन दरमहा नियमित होण्यासाठी जुलै, आॅगस्ट २०१९ मध्ये लेखी तसेच बैठकांमध्येही निर्देश दिले होते. तरीही वेतन वेळेवर होण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ठरलेली प्रक्रिया पूर्ण करण्यास शाळा, पंचायत समिती स्तरावर कमालीचा विलंब केला जातो. त्यामुळे वेतन देयके कोषागार कार्यालयात सादर करण्यासही विलंब होतो. परिणामी, शिक्षकांचे वेतनही वेळेवर होत नाही. याबाबत पंचायत समिती स्तरावर संबंधित अधिकारी-कर्मचाºयांवर कारवाई करणे आवश्यक आहे; मात्र गटशिक्षणाधिकाºयांकडून तशी कोणतीही कारवाई केल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी नाराजीही व्यक्त केली आहे. शालार्थ प्रणालीतील प्रक्रियेनुसार ठरल्याप्रमाणे कार्यवाही न झाल्यास शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब होतो. यापुढे शाळा, पंचायत स्तरावरून शालार्थ प्रणालीबाबत हलगर्जी केल्यास, त्यामुळे शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब झाल्यास ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली जाईल. तसेच संबंधितांवर कारवाईही केली जाईल, असा इशारा ठग यांनी पत्रातून दिला आहे.

माध्यमिक शाळा शिक्षकांची समस्याजिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा शिक्षकांच्या वेतनास सातत्याने विलंब केला जातो. त्यामुळे संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. त्यामध्ये अकोला शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक कन्या शाळा, आगरकर माध्यमिक शाळा, आगरकर उच्च माध्यमिक शाळा, माध्यमिक उर्दू शाळा, माध्यमिक शहर शाळा, माध्यमिक शाळा मूर्तिजापूर, माध्यमिक शाळा बाळापूर, माध्यमिक शाळा-उच्च माध्यमिक शाळा अकोट, माध्यमिक शाळा कान्हेरी गवळी, माध्यमिक शाळा अडगाव, माध्यमिक शाळा हिवरखेड, माध्यमिक शाळा माना या शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदTeacherशिक्षक