शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विषय शिक्षकांची नियुक्ती करण्यात विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 14:52 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या विषय शिक्षक नियुक्तीसाठी शासनाने २ नोव्हेंबर रोजी पत्र देत प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे बजावले असतानाही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून त्यासाठी कमालीचा विलंब केला जात आहे.

अकोला: जिल्हा परिषदेच्या विषय शिक्षक नियुक्तीसाठी शासनाने २ नोव्हेंबर रोजी पत्र देत प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे बजावले असतानाही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून त्यासाठी कमालीचा विलंब केला जात आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष उफाळत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमाच्या १६१६ विषय शिक्षकांच्या यादीवर शिक्षण विभागाने २२ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप मागविण्यात आले. २४ आॅक्टोबरपर्यंत पडताळणी करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्याच्या नियोजनाचा पार फज्जा उडाला आहे. ४७१ विषय शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षा आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या २२९0 शिक्षकांच्या बदल्या शासनाने केल्या. त्या आॅनलाइन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाले. ते दुरुस्त करून न्याय मिळण्याच्या मागणीसाठी शिक्षकांना आंदोलन करावे लागले. सोबतच विषय शिक्षकांच्या नियुक्तीसह इतर मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघटना संघर्ष समितीच्यावतीने उपोषणही करण्यात आले. त्यानंतर शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीची ग्रामविकास मंत्र्यांकडे बैठक झाली होती. त्यातही विषय शिक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्यासह इतर प्रलंबित विषय सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी मराठी माध्यमाच्या १३७४ व उर्दू माध्यमाच्या २४२ शिक्षकांची पदोन्नती (विषय शिक्षक) करायची असल्यामुळे सेवाज्येष्ठता यादी १५ आॅक्टोबर रोजी जाहीर केली. त्यावेळी २२ आॅक्टोबरपर्यंत शिक्षकांकडून आक्षेप नोंदवून पंचायत समिती स्तरावर दुरुस्तीसह २४ आॅक्टोबरपर्यंत आक्षेपांची पडताळणी करण्याचे ठरले. त्यानंतर ४७१ शिक्षकांना नियुक्ती दिली जाईल, असेही शासनाला सांगण्यात आले; मात्र प्राथमिक शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार विषय शिक्षकांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी २४ आॅक्टोबरनंतर अद्यापही प्रसिद्ध झालेली नाही. त्यातच ग्रामविकास विभागाने २ नोव्हेंबर रोजी पत्र देत विषय शिक्षण नियुक्तीचा तिढा १५ नोव्हेंबरपर्यंत सोडविण्याचे निर्देशही जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. त्याचाही कोणताच परिणाम प्रशासनावर झालेला नाही. त्यामुळेच अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद