शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

राजराजेश्वराला भक्तांचा जलाभिषेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा लोकोत्सव झाला आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त मंडळांकडून पूर्णेचे पाणी आणले जाते. देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा असून, या वर्षी शिवभक्तांनी राजराजेश्वराला, तर भक्तांना वरुणराजाने जलाभिषेक ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा लोकोत्सव झाला आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त मंडळांकडून पूर्णेचे पाणी आणले जाते. देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा असून, या वर्षी शिवभक्तांनी राजराजेश्वराला, तर भक्तांना वरुणराजाने जलाभिषेक करून, हा आनंदसोहळा द्विगुणित केला.यावर्षी पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावली व वातावरणात आनंद भरला. सोमवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. गांधीग्राम येथून पूर्णेच्या पात्रातून जल आणून, त्याचा अभिषेक राजराजेश्वराला केला. यावेळी पावसानेही हजेरी लावत शिवभक्तांवर अभिषेक केल्याचे दृष्य होते. यंदाच्या पालखीमध्ये जुने शहरातून सर्वाधिक भरणे असलेली कावड डाबकी रोडवासी मित्र मंडळाची होती, यंदा ७७१ भरण्यांची कावड काढली. त्यापाठोपाठ हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळाची ७५१ भरणे, मानाचे स्थान असलेल्या हरिहर शिवभक्त मंडळाची ४०१ आणि सर्वाधिक चार हजार सदस्य असलेल्या जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १११ भरण्यांची कावड अकोलेकरांसाठी आकर्षण ठरली. कावडसोबतच शिभक्तांनी पालखीवर कल्पक आणि आकर्षक देखावे उभारले होते.विविध शिवभक्त मंडळांनी साकारलेले पालखीवरील आकर्षक देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. महादेवाच्या विविध छटा शिवभक्त मंडळांनी साकारल्या होत्या. कावडयात्रा उत्सव हा अकोलेकरांसाठी एक पर्वणीच ठरली. या सोहळ्यानिमित्त व्यापारी, दुकानदार यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद करून उत्सवात सहभाग घेतला. नागरिकांनीही हा उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गांधीग्राम ते अकोला १७ किमीचे अंतर पायी कापल्यानंतरही पालखीतील शिवभक्तांचा उत्साह जराही कमी झाला नाही.शिवभक्तानी राजेश्वराला पाच प्रदक्षिणा घालून शिवभक्तांनी भक्तिभावाने जलाभिषेक केला. चिमुकल्या बालक, युवक, आबालवृद्ध सर्वच कावडयात्रेचे खांदेकरी होऊन उत्साहात सहभागी झाले. पालखी मार्गावरील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांच्यावतीने शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.