शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट सिमेंट रस्ते; ‘व्हीएनआयटी’मार्फत तपासणीचा मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:16 IST

अद्यापही ‘व्हीएनआयटी’च्या तपासणीला मुहूर्त सापडत नसल्याने मनपाने भाजप लोकप्रतिनिधींच्या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आहे.

अकोला: शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे अत्यंत दर्जाहीन होत असल्याची तक्रार भाजपच्या खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी रस्त्यांचे सोशल आॅडिट केले. यासंदर्भातील अहवाल पुढील कारवाईसाठी मनपा प्रशासनाकडे सोपवल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी रस्त्यांची ‘व्हीएनआयटी’(विश्वेश्वरैया राष्ट्रीय औद्योगिकी संस्थान)मार्फत नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेत सर्वसाधारण सभेचा ठराव मिळवला. ठराव घेऊन चार महिन्यांचा कालावधी होत आला तरी अद्यापही ‘व्हीएनआयटी’च्या तपासणीला मुहूर्त सापडत नसल्याने मनपाने भाजप लोकप्रतिनिधींच्या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आहे.शहरातील दर्जाहीन सिमेंट रस्त्यांची अवघ्या पाच ते सहा महिन्यांत वाट लागल्यानंतर खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर तसेच भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मनपाच्या अखत्यारीत तयार करण्यात आलेल्या सहापैकी पाच सिमेंट रस्त्यांचे निर्माण करताना मजबुतीकरणाचे सर्व निकष-नियम पायदळी तुडविण्यात आल्याने अवघ्या सहा महिन्यांतच सिमेंट रस्त्यांवर ठिकठिकाणी ठिगळ लावण्याची वेळ कंत्राटदारावर आली होती. याप्रकरणी भाजप लोकप्रतिनिधींनी सखोल चौकशीची मागणी लावून धरल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयोगशाळा इत्यादी तीन यंत्रणांमार्फत रस्ते कामांचे २२ ते २७ जुलै २०१८ दरम्यान सोशल आॅडिट केले. सोशल आॅडिटच्या अहवालात पाच सिमेंट रस्त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी मनपाकडे अहवाल सादर केला होता. हा अहवाल बाजूला सारत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’(विश्वेश्वरैया राष्ट्रीय औद्योगिकी संस्थान)मार्फत सिमेंट रस्त्यांची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय २२ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत घेतला.पत्रव्यवहारासाठी चार महिनेयासंदर्भातील ठराव तयार झाल्यानंतर मनपाने ‘व्हीएनआयटी’कडे पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. या पत्रानंतर संबंधित यंत्रणेकडून तपासणीसाठी नेमका किती खर्च येईल, याबद्दल माहिती दिली जाणार आहे. अर्थात, ‘व्हीएनआयटी’ने सादर केलेला खर्च मनपाला न परवडल्यास पुढे काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. एकूणच या प्रकरणी प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित होत आहेत.

दोन महिने ठराव रखडतोच कसा?मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी २२ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत ‘व्हीएनआयटी’मार्फत रस्त्यांची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव सभागृहात मंजूर झाला. एरव्ही पदाधिकारी असो वा प्रशासन या दोघांच्या हिताचे ठराव मंजूर होण्यापूर्वीच त्याला कार्योत्तर मंजुरी दिली जाते. ‘व्हीएनआयटी’चा ठराव दोन महिने रखडला होता. यावरून प्रशासन व सत्ताधारी भाजप किती गंभीर आहेत, याचा प्रत्यय येतो.भाजपच्या भूमिकेकडे अकोलेकरांचे लक्षनिकृष्ट रस्त्यांची तक्रार भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केल्यानंतरच खऱ्या अर्थाने चौकशीला प्रारंभ झाल्याचा दावा महापौर विजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केला होता. याप्रकरणी प्रशासनाचा उदासीन कारभार लक्षात घेता भाजप काय निर्णय घेते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका