शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट सिमेंट रस्ते; महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार फैसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:50 IST

अकोला: शहरातील निकृष्ट सिमेंट रस्त्यांप्रकरणी मनपा प्रशासनाकडून कारवाईचा प्रस्ताव महासभेत सादर केला जाणार आहे.

अकोला: शहरातील निकृष्ट सिमेंट रस्त्यांप्रकरणी मनपा प्रशासनाकडून कारवाईचा प्रस्ताव महासभेत सादर केला जाणार आहे. २२ जानेवारी रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात पार पडणाऱ्या सभेमध्ये संबंधित अभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच कंत्राटदारावर सत्ताधारी भाजपकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.तत्कालीन काँग्रेस-आघाडी सरकारच्या कालावधीत २०१२ मध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाला १५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून सहा सिमेंट आणि ११ डांबरी रस्त्यांचा समावेश होता. प्रशासनाने निविदा प्रकाशित केल्यानंतर स्थानिक आरआरसी नामक कंपनीने सादर केलेली पाच सिमेंट रस्त्यांची निविदा मंजूर करण्यात आली. रस्ते दुरुस्तीच्या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीतच या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे समोर आले होते. यासंदर्भात भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्यासह इतर पदाधिकाºयांनी आक्षेप नोंदविल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रयोगशाळा इत्यादी तीन यंत्रणांमार्फत रस्ते कामांचे २२ ते २७ जुलै २०१८ दरम्यान सोशल आॅडिट केले. या आॅडिटमध्ये महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार केलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघडकीस आले.पालकमंत्र्यांचे ‘व्हीसी’द्वारे निर्देशनिकृष्ट सिमेंट रस्ते प्रकरणात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी १३ डिसेंबर रोजी आयोजित ‘व्हीसी’द्वारे जिल्हाधिकाºयांना जबाबदारी निश्चित करून कारवाईचा प्रस्ताव मनपाच्या सभागृहाकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने मनपा आयुक्त संजय कापडणीस २२ जानेवारी रोजी आयोजित सभेत प्रस्ताव सादर करतील.अभियंता, कनिष्ठ अभियंता अडचणीतसिमेंट रस्त्यांची जबाबदारी मनपाचे तत्कालीन शहर अभियंता इक्बाल खान, कार्यकारी अभियंता अजय गुजर, तत्कालीन उपअभियंता अनिल गावंडे, तत्कालीन उपअभियंता रवींद्र जाधव,कनिष्ठ अभियंता युसूफ खान रफिक अहमद खान,कृष्णा वाडेकर, शशिकांत गुहे व मनोज गोगटे यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. शहरातील रस्ते निकृष्ट असल्याचे समोर आल्याप्रकरणी मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच अभियंत्यांची मोठी फळी अडचणीत सापडली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका