शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आज होणार ‘भूमिगत’वर निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:36 IST

अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत मंजूर झालेल्या भूमिगत गटार योजनेची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये शुक्रवारी पुन्हा भूमिगत गटार योजनेच्या निविदेवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या भूमिकेकडे लक्षसादरीकरणासाठी आग्रही का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत मंजूर झालेल्या भूमिगत गटार योजनेची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये शुक्रवारी पुन्हा भूमिगत गटार योजनेच्या निविदेवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत अकोला शहरासाठी भूमिगत गटार योजना मंजूर झाली असून ७९ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. महापालिकेने ६१ कोटी रुपये किमतीच्या कामांची निविदा प्रकाशित केली असता इगल इन्फ्रा लिमिटेड कंपनीने ८.९१ टक्के जादा दराने निविदा सादर केली. प्रशासनाने सदर कंपनीची निविदा मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी टिप्पणी स्थायी समितीकडे सादर केली.  स्थायी समितीच्या १३ सप्टेंबर रोजीच्या सभेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तयार केलेल्या ‘भूमिगत’च्या प्रकल्प अहवालावर भाजप नगरसेवकांनी आक्षेप नोंदवित अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ‘डीपीआर’मध्ये ‘एसटीपी’च्या जागेचा समोवश नसून, नेमक्या कोणत्या भागात नाल्यांचे खोदकाम होईल, त्याचे सर्वेक्षण कधी करण्यात आले, पम्पिंग मशीनची उभारणी कोठे होईल, आदी प्रश्नांवर प्रशासन समाधानकारक खुलासा करू शकले नव्हते. त्यामुळे ही निविदा रद्द करून फेरनिविदा बोलाविण्याची मागणी भाजपाचे सदस्य अजय शर्मा, सुनील क्षीरसागर, सुजाता अहीर, शिवसेनेचे सदस्य राजेश मिश्रा, काँग्रेसचे नगरसेवक अँड. इकबाल सिद्दिकी, पराग कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे फैयाज खान, एमआयएमचे नगरसेवक मोहम्मद मुस्तफा यांनी लावून धरली होती. सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी व प्रशासनाची भूमिका लक्षात घेऊन, स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी भूमिगतची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांच्या आत महापालिकेला राज्य शासनाचे धमकीवजा पत्र प्राप्त झाले. त्यामध्ये ३0 सप्टेंबरपर्यंत प्रकल्पाची वर्कऑर्डर न दिल्यास योजनेसाठी मंजूर निधी इतर शहरांसाठी वापरण्याचे निर्देश होते. भाजपाने पत्राची तातडीने दखल घेत २२ सप्टेंबर रोजी ‘भूमिगत’च्या विषयावर पुन्हा स्थायी समिती सभेचे आयोजन केले आहे. 

सादरीकरणासाठी आग्रही का नाही?शहरातील सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करून त्याचा शेती व उद्योगासाठी वापर करता येईल, अशी ही योजना असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. ‘पीएम’आवास योजना, वैयक्तिक शौचालय योजना तसेच ‘डिजिटल स्कूल’संदर्भात प्रशासनाने सादरीकरण केले होते. भूमिगत गटार योजनेची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्याची माहिती झालीच पाहिजे, यासाठी सत्ताधारीसुद्धा आग्रही असतात. कोट्यवधी रुपयांच्या ‘भूमिगत’ योजनेसंदर्भात प्रशासनाने सादरीकरण का केले नाही आणि त्यासाठी सत्ताधार्‍यांनी आग्रही भूमिका का घेतली नाही, असा सवाल उपस्थित होतो.

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्षकरवाढीच्या मुद्यावर आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी हस्तक्षेप करीत विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित केली होती. भूमिगत गटार योजनेच्या निविदेसंदर्भात चाललेला खेळखंडोबा पाहता आ. बाजोरिया कोणते पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गटनेता राजेश मिश्रा यांनी भूमिगत गटार योजनेच्या निविदेला कडाडून विरोध दर्शविला होता. या विरोधाची धार कितपत कायम राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

‘टीडीआर’वर निर्णय प्रलंबित पण..केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना घरे बांधून देण्यासाठी शहरात शासकीय जागेची वानवा आहे. त्यावर उपाय म्हणून खासगी जमिनीला ‘टीडीआर’ दिल्यास केवळ त्याच जमिनीवर आवास योजनेंतर्गत घरे बांधून देणे शक्य होईल, या विचारातून महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनामार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव सादर करून तीन महिन्यांचा कालावधी होत असून, अद्यापही हा प्रस्ताव नगररचना संचालक, पुणे कार्यालयाकडे पडून आहे. गोरगरिबांच्या घरांसाठी तयार केलेला प्रस्ताव धूळ खात असतानाच भूमिगत गटार योजनेच्या निविदेवर मात्र शासन मनपावर डोळे वटारून कारवाई करण्यास भाग पाडत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे.