शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
2
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
3
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
4
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
5
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
6
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
7
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
8
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
9
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
10
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
11
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
12
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
13
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
14
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
16
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
17
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
18
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
19
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
20
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस

आज फैसला; उत्सुकता शिगेला

By admin | Updated: October 19, 2014 01:14 IST

अकोला जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील ९३ उमेदवारांचे ठरणार भाग्य!

अकोला : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. या मतमोजणीत जिल्हय़ातील पाचही मतदारसंघातील ९३ उमेदवारांचे राजकीय भाग्य ठरणार आहे. त्यामुळे निवडणूक निकालात कुणाचे भाग्य फळफळते आणि कोणाकोणाला पराभवाचा सामना करावा लागतो, याबाबत जिल्हावासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हय़ातील आकोट, बाळापूर, अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघातील १ हजार ४८0 मतदान केंद्रांवर बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत पाचही मतदारसंघातील ९३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. प्रत्येक मतदारसंघाची मतमोजणी १५ टेबलवर होणार आहे. त्यामध्ये १४ टेबलवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी होणार असून, एका टेबलवर पोस्टल मतांची मतमोजणी होणार आहे. त्यानुसार जिल्हय़ातील पाचही मतदारसंघांची मतमोजणी एकूण ७५ टेबलवर होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक मतगणना पर्यवेक्षक, एक मतगणना सहाय्यक व एक सूक्ष्म निरीक्षक असे तीन कर्मचारी राहणार आहेत. त्यानुसार पाचही मतदारसंघात ७५ टेबलवर होणार्‍या मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून एकूण २२५ मतगणना कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर जाहीर होणार्‍या निवडणूक निकालात जिल्हय़ातील पाचही मतदारसंघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. त्यानुषंगाने निवडणूक निकालात कोणाकोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते आणि कोणाकोणाला पराभवाचा धक्का सहन करावा लागणार, याबाबतचे चित्र मतमोजणीनंतर रविवारी दुपारी १ वाजेपर्यंंत स्पष्ट होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील पाचही मतदारसंघांच्या निवडणूक निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.