शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘शेडनेट, पॉलीहाउस’च्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 13:41 IST

अकोला : शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यातील शेडनेट हाउस, पॉलीहाउस व इमुपालनासाठी कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे.

ठळक मुद्देथकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेडनेट हाउस, पॉलीहाउस व इमुपालनाच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

- संतोष येलकरअकोला : शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यातील शेडनेट हाउस, पॉलीहाउस व इमुपालनासाठी कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात येत असून, कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महाआॅनलाइन’ विभागामार्फत संबंधित बँकांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनामार्फत गतवर्षी जूनमध्ये घेण्यात आला. त्यानुसार कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर कर्जमाफी योजनेच्या विस्तारात शेडनेट हाउस, पॉलीहाउस आणि इमुपालनासाठी बँकांकडून कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकºयांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय गत २१ मे २०१८ रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या राज्यातील शेडनेट हाउस, पॉलीहाउस व इमुपालनासाठी कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या संबंधित शेतकऱ्यांपैकी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत राज्यातील विविध जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या ‘ग्रीन’ याद्यांची पडताळणी करण्यात आल्यानंतर संबंधित शेडनेट हाउस, पॉलीहाउस व इमुपालनाच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.शासन निर्णयानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेडनेट, पॉलीहाउस व इमुपालनाच्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या ग्रीन याद्या शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत बँकांकडे प्राप्त होत आहेत.-गोपाळ मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी