शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधी निवडणुकांसाठी कर्जमाफीचे नाटक !

By admin | Updated: June 30, 2017 01:55 IST

अ‍ॅड. आंबेडकरांची भाजपा व संघावर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करुणा, दया अशा भावना नाहीत.कोणतीही गोष्ट घडली, की फाशी द्या, ही त्यांची सरळ मागणी असते. अशा संघटनांकडून शेतकरी कर्जमाफीची अपेक्षाच नाही. कर्जमाफीचे धोरण जाहीर झाल्यापासून आदेश निघेपर्यंत अटी व शर्तींमध्ये हे धोरण अडकले आहे. मुळात या सरकारला कर्जमाफी द्यायचीच नाही; मात्र मध्यावधी निवडणुका जिंकण्यासाठी शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून कर्जमाफी देण्याचे नाटक सुरू केल्याची टीका भारिप-बमसंचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.यासंदर्भात अ‍ॅड. आंबेडकर यांनी गुरुवारी काढलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सरकारने कर्जमाफीच्या अटीमध्ये शेतकऱ्यांना गुंतवले आहे. ज्यांनी दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांनी आधी दीड लाखांवरचे कर्ज भरले तरच त्याचे कर्ज माफ होणार आहे. दुसरीकडे बहुतांश शेतकऱ्यांनी आपली आर्थिक पत बँकेत वाढावी म्हणून ३० मार्चच्या आत नवीन कर्ज काढले आणि त्या माध्यमातून जुने कर्ज फेडले आहे, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ नाही. तसेच चालू वर्षाचे कर्ज माफ केलेले नाही. ही सारी खेळी शेतकऱ्यांना कमीत कमी लाभ मिळावा, यासाठीच आहे. भाजपा व संघ हे शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते होणार नाहीत, त्यामुळे शेतीच्या प्रश्नावर लढणारे या संघटनांसोबत राहिले तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असेही त्यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.