शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचा घोळ; आरोपींची बचावासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:06 IST

चौकशीअंती प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून यातील आरोपींनी आता बचावासाठी धडपड सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अज्ञानी, अशिक्षित, आदिवासी शेतकऱ्यांना अडगाव बु.च्या सेंट्रल बँकेने पीक आणि सिंचनासाठी वाटप केलेल्या कर्जात मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ झाल्याची चौकशी लीड बँकेने सुरू केली आहे.याप्रकरणाची वृत्तमालिका लोकमत ने प्रकाशित करताच तसेच सुरू असलेल्या चाौकशीमुळे बँक अधिकारी, राजकीय पुढारी, एजंट आणि यामध्ये गुंतलेल्या आरोपींचे धाबे दणाणले आहेत. चौकशीअंती प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून यातील आरोपींनी आता बचावासाठी धडपड सुरू केली आहे.तेल्हारा तालुक्यातील पिंपरखेड आणि भिली येथील आदिवासी शेतकऱ्यांना गंडविल्या जात असल्याच्या तक्रारींच्या गंभीर तक्रारी गत चार वर्षांपासून सातत्याने येत आहेत; मात्र पोलिसांकडून तक्रारींना केराची टोपली दाखविली जात होती. दरम्यान, बँकेच्या वरिष्ठांकडे तक्रारी आल्याने लीड बँकेने मागील आॅडिटची चाचपणी केली आहे. संशयास्पद भूमिका निभावणाºया बँक अधिकारी आणि कर्मचाºयांना येथून तातडीने हलविले जात आहे. कारवाई सुरू होत असल्याने आता सावळा गोंधळातील आरोपींनी बचावासाठी धावपळ सुरू केली आहे. शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त झळकल्यानंतर आठ आदिवासी कोरकूंवर अन्याय झाला म्हणून ठाण्यात पोहोचले. रविवारी ‘लोकमत’ने संपूर्ण मूळ प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर पुन्हा रविवारी दुपारी ४८ आदिवासी पुन्हा हिवरखेड पोलीस ठाण्यात आणि अकोटच्या एसडीओ कार्यालयात धडकले. आमच्यावर अन्याय झाला नसल्याची भूमिका घेत प्रतिज्ञापत्र घेऊन हे आदिवासी आले होते. अज्ञानी आणि अशिक्षित असणाºया आदिवासींना आकडे ओळखनाही. तिथे प्रतिज्ञापत्र कसे समजणार, या आदिवासींना कुणी आणले, कशासाठी आणले, अशिक्षित आदिवासींचे प्रतिज्ञापत्र कुणी तयार केले, त्यांचा खर्च कुणी आणि का केला, या सर्व बाबींची चौकशी करण्याची गरज आहे.पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाचीआदिवासी शेतकºयांच्या नावे अतिरिक्त कर्ज काढून नाममात्र रक्कम त्यांना देऊन गंडविणाºया टोळीचा पर्दाफाश करण्याची गरज यानिमित्ताने पुढे येत आहे. या प्रकरणाचा तपास झाल्यास कारवाईच्या धाकावर लक्षावधींची पिळवणूक करणारे अनेकजण चौकशीत अडकण्याचीदेखील शक्यता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे द्यावा, अशी मागणीदेखील जागरूक लोकांकडून होत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक