शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

अनुदानाची रक्कम गोठवून कर्ज वसुलीची नोटिस

By admin | Updated: June 2, 2017 01:44 IST

खेट्री : येथील दिव्यांग घरकुल लाभार्थी शेख फयुम शेख बिस्मिल्ला यांच्या घरकुलाच्या अनुदानाची रक्कम सस्ती येथील स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी गोठून ठेवली.

लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री : येथील दिव्यांग घरकुल लाभार्थी शेख फयुम शेख बिस्मिल्ला यांच्या घरकुलाच्या अनुदानाची रक्कम सस्ती येथील स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी गोठून ठेवली. लाभार्थीला कर्जाची नोटिस पाठविल्याचा प्रकार ३० मे रोजी उघडकीस आला.घरकुल अनुदानाची रक्कम गेल्या काही महिन्यांपूर्वी सस्ती स्टेट बँकेतील लाभार्थीच्या खात्यात जमा झाल्याची माहिती मिळताच लाभार्थी पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता, सदर अनुदानाची रक्कम पूर्वीच्या कर्जामध्ये जमा केल्याचे शाखा प्रमुख नीलेश दुबे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे पूर्वीच्या कर्जामध्ये रक्कम नक्कीच कमी झाली असेल; परंतु लाभार्थीच्या पूर्वीच्या कर्जामध्ये रक्कम काहीच कमी झाली नाही आणि जेवढे कर्ज होते, तेवढ्याच थकीत कर्जाची नोटिस त्यांना पाठविण्यात आली. याविषयी लाभार्थीने मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, बीडीओ, तहसीलदार व संबंधिताकडे तक्रार केली, तरी अद्यापही दखल घेतली नाही. याबाबत शाखा प्रमुख नीलेश दुबे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. नियमाची पायमल्ली अनुदानाची रक्कम त्वरित लाभार्थीपर्यंत पोहोचवून देण्याचे शासनाचे आदेश व नियम आहे; परंतु शाखा प्रमुख नीलेश दुबे यांच्या हेकेखोरपणामुळे चार महिन्यांपासून लाभार्थीला अनुदानाची रक्कम देण्यात आली नाही. उलट कर्जाची नोटिस पाठवून त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. दिव्यांग लाभार्थीच्या तक्रारीची त्वरित दखल घेतली आहे. अनुदानाची रक्कम कायद्यानुसार पूर्वीच्या अर्जामध्ये जमा करता येत नाही. लाभार्थीच्या अनुदानाची रक्कम पूर्वीच्या कर्जामध्ये जमा करू नये, असे शाखा प्रमुखांना सांगितले आहे. लाभार्थीने पूर्वीच्या कर्जामध्ये काहीना काही पैसे भरावे, असा शाखा प्रमुखांचा उद्देश होता. - तुकाराम गायकवाड, लिड जिल्हा मॅनेजर, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, अकोला.