शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक धोरणावर जिल्हा परिषदेत मंथन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:36 IST

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्यावतीने आयोजित कार्यशाळेत शैक्षणिक धोरणाच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्दे कार्यशाळेत शैक्षणिक धोरणाच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.शैक्षणिक धोरणासंदर्भात आयोजित या कार्यशाळेत विविध मुद्यांची माहिती देण्यात आली.शिक्षणासाठी वित्तपुरवठा, राष्ट्रीय शिक्षण आयोग इत्यादी महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.

अकोला: शैक्षणिक धोरणाच्या मुद्यावर मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहात मंथन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्यावतीने आयोजित कार्यशाळेत शैक्षणिक धोरणाच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०१९ देशाला केंद्रस्थानी मानून तयार करण्यात येत असून, त्यामध्ये सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद सभागृहात शैक्षणिक धोरणाच्या मुद्यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे यांनी केले. कार्यशाळेत शैक्षणिक धोरणासंदर्भात झालेल्या चर्चेत प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी विचार मांडले. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाधील मसुद्याच्या तपशिलाची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. या कार्यशाळेत जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, काही गावांचे सरपंच, शिक्षक, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचे पालक, अभ्यासक्रमाची पुस्तके विक्रेते उपस्थित होते. या घटकांनी शैक्षणिक धोरणासंदर्भात चर्चेत सहभाग घेत विविध शिफारशी मांडल्या. कार्यशाळेचे संचालन विषय सहायक जितेंद्र काठोळे यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ अधिव्याख्याता सागर तुपे यांनी केले.कार्यशाळेत ‘या’ मुद्यांची देण्यात आली माहिती!शैक्षणिक धोरणासंदर्भात आयोजित या कार्यशाळेत विविध मुद्यांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचा विस्तार, इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये प्रारंभिक भाषा व गणित या विषयाकडे विशेष लक्ष पुरविणे, वाचन व संवादाची सवय आणि संस्कृतीची बांधणी करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक व शालेय ग्रंथालयांचा विस्तार करणे, शालेय पूर्वतयारी अभ्यास, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर, पालक-स्थानिक समुदाय तसेच समाजसेवक व स्वयंसेवकांचा सहभाग घेणे आदी मुद्यांवर माहिती देण्यात आली.धोरणात असे आहेत महत्त्वाचे घटक!संपूर्ण शैक्षणिक धोरणात विविध १२ घटक असून, त्यामध्ये शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, शिक्षक पेषाविषयक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, नॅशनल रिसर्च फाउंडेशन, शिक्षणामुळे तंत्रज्ञान, प्रौढ प्रशिक्षण, भारतीय भाषांना चालना, शिक्षणासाठी वित्तपुरवठा, राष्ट्रीय शिक्षण आयोग इत्यादी महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद