शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा मृत्यू; नातेवाइकांनी केला घातपाताचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:34 IST

नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त करून चौकशी करावी, या मागणीसाठी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी खदान पोलीस ठाण्यात आणला.

अकोला : यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी एका महिला राखीपौर्णिमेसाठी अकोल्यात खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत नणंदेकडे आल्यानंतर शनिवारी रात्री विजेच्या धक्क्याने या महिलेचा मृत्यू झाला; मात्र महिलेच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी महिलेचा मृतदेह नातेवाइकांनी रविवारी दुपारी खदान पोलीस ठाण्यात आणला. पोलिसांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह हलविला.यवतमाळ जिल्ह्यातील गवळपेंड येथील रहिवासी लता रामभाऊ जाधव या शनिवारी संध्याकाळी अकोला येथील त्यांची नणंद मनकर्णा राजू राठोड यांच्याकडे आल्या होत्या. रात्री त्यांना घरात विजेचा शॉक लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचे शवविच्छेदनही करण्यात आले. लता जाधव यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या आई-वडिलांना दिल्यानंतर ते अकोल्यात पोहोचले. तोपर्यंत त्यांचे शवविच्छेदनही करण्यात आले होते. आपल्या मुलीचा मृत्यू शॉक लागून झाला नाही, तर घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त करीत खदान पोलीस ठाणे गाठले व संशयितांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांच्या बोलण्यावरून त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी मृतदेहच खदान पोलीस ठाण्यात आणला होता. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याची हमी पोलिसांनी दिल्यानंतर त्यांनी मृतदेह हलविला. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलिसांनी सुरू केला असून, उत्तरीय तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी