खामगाव : विहिरीच्या बांधकामावर पाणी टाकत असताना, विहीर खचल्याने दोन मजुरांचा विहिरीत पडून बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना खामगाव तालुक्यातील वडजी भेंडी येथे सोमवारी दुपारी ४.३0 वाजता दरम्यान घडली. वडजी भेंडी येथील अशोक गोरे यांच्या शेतात नव्या विहिरीच्या बांधकामावर पाणी टाकण्याचे काम सुरु होते. अचानकपणे विहीर खचली. यामुळे पाणी टाकत असलेले भगवान पुंजाजी मांजरे ( वय २४) व मंगेश अरुण बोचरे(वय २२) हे दोघे खचलेल्या मलब्यासोबत विहिरीत पडले व बुडाल्याने भगवान मांजरे व मंगेश बोचरे दोघेही रा. काळेगाव ता. खामगाव यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आकाश लिगाडे, ठाणेदार डी.डी.ढाकणे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
विहीर खचल्याने दोघांचा मृत्यू
By admin | Updated: September 8, 2015 02:21 IST