शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अल्पभूधारक शेतकर्‍याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:45 IST

तेल्हारा / हिवरखेड : तालुक्यातील चांगलवाडी येथील एका अल्पभूधारक शेतकर्‍याला १५ ऑगस्टच्या दुपारी शेतातील विद्युत मोटार पंप बंद करताना शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.

ठळक मुद्देचांगलवाडी येथील घटना विद्युत मोटार पंप बंद करताना शॉक लागल्याने मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा / हिवरखेड : तालुक्यातील चांगलवाडी येथील एका अल्पभूधारक शेतकर्‍याला १५ ऑगस्टच्या दुपारी शेतातील विद्युत मोटार पंप बंद करताना शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.पावसाने दडी मारल्यामुळे बागायतदार शेतकर्‍यांनी आपली पिके वाचविण्यासाठी शेतामध्ये मोटार पंप चालू केले होते.  १५ ऑगस्टला दुपारी ३ वाजता चांगलवाडी परिसरात पाऊस आल्याने सुरू असलेले मोटार पंप बंद करण्यासाठी अल्पभूधारक शेतकरी अवचित श्रीराम कडू (६0) शेतात गेले. तेथे विद्युत पुरवठा बंद करताना त्यांना विजेचा जबर धक्का लागून मृत्यू झाला. याबाबत घरातील लोकांना कसलीही कल्पना नव्हती. ते मंगळवारी रात्री व  दुसर्‍या दिवशीही घरी आले नाही म्हणून शोधाशोध केली असता, आपल्या शेतालगत असलेल्या मारोती संस्थानच्या शेतात विद्युत मीटरच्या पेटीजवळ ते मृतावस्थेत  आढळून आल्याची फिर्याद चांगलवाडी येथील गजानन कडू यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यावरून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे , हेड कॉन्स्टेबल राजू इंगळे हे करीत आहेत. मृताच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा आप्त परिवार आहे.