शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याअभावी शेळ््या-मेढ्यांचा मृत्यू; चारा छावण्या सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 14:53 IST

गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

अकोला: दुष्काळग्रस्त तेल्हारा तालुक्यात जनावरांना चारा उपलब्ध नाही. मृग नक्षत्रातही पाऊस न पडल्याने चारा उगवलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील करी रूपागड, भिली, चित्तलवाडी, धोंडाआखर या गावांमध्ये आतापर्यंत ५० पेक्षाही अधिक शेळ््या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. या गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सोबतच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकाºयांनाही समस्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.तेल्हारा तालुका दुष्काळग्रस्त आहे. तसेच उत्तरेकडील भाग डोंगराळ आहे. या भागात मृग आटोपला तरीही पाऊस पडला नाही. त्यामुळे चाराही उगवलेला नाही. त्यातच या भागातील ग्रामस्थांकडे मोठ्या प्रमाणात जनावरे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेळ््या-मेंढ्या आहेत. या जनावरांना गावलगत चारा उपलब्ध नाही. तर काही भाग व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये दाखवून डोंगरात चराईबंदी आहे. या दुहेरी अडचणीत पशुपालक अडकले आहेत. ऐन पावसाळ््यात चारा उपलब्ध नसल्याने जनावरांचा त्याअभावी मृत्यू होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून चारपैकी कोणत्याही गावात चारा छावणी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी १८ जून रोजीच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली; मात्र अद्यापही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी पुन्हा जिल्हाधिकाºयाकडे धाव घेतली. जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह ग्रामस्थ बोदर करंडे, सोनाजी पिसाळ, सोनाजी महारनर, छोडू महारनर, चवळीराम करंडे, दशरथ करंडे, नाना पिसाळ, विठ्ठल मार्कंड, तानू मार्कंड, नाना चांडे, मरकू कुरडकर, चैत्रा फडगर, गुलाब भोदे उपस्थित होते.- जिल्हा परिषदेचा प्रस्तावच नाहीविशेष म्हणजे, या भागात तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीचा ठराव गेल्या सर्वसाधारण सभेत गोपाल कोल्हे यांनी मांडला होता. तो मंजूरही आहे. त्या ठरावानुसारचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने अद्यापही जिल्हाधिकारी, शासनाकडे पाठवला नाही. त्यामुळे ग्रामस्थांची ही समस्या ‘जैसे थे’ आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय