शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधिताचा मृत्यू : पुरेपूर खबरदारीत केले जातात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 12:10 IST

वैद्यकीय सूचनांची पूर्ण खबरदारी व प्रत्येकाच्या धर्मानुसार विधी करूनच अंत्यसंस्कार केले जात आहेत.

अकोला : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक धास्तावले असून, कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढतेच आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतकांच्या नातेवाइकांसाठी अंतिम संस्काराच्या विधीमध्येही कोविड नियमांचे पालन आवश्यक आहे. त्यामुळे आप्त स्वकियांच्या अंतिम संस्कार प्रसंगातही फक्त कुटुंबातील निवडक लोकांनाच प्रवेश मिळतो. वैद्यकीय सूचनांची पूर्ण खबरदारी व प्रत्येकाच्या धर्मानुसार विधी करूनच अंत्यसंस्कार केले जात आहेत.अकोल्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूदराची चिंता प्रशासनासमोर गंभीरपणे उभी ठाकली आहे. रविवारपर्यंत तब्बल १६५ मृत्यूची नोंद झाली असून, सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी दोन मृत्यू आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा प्रसंग हा नातेवाइकांसाठी अतिशय क्लेषदायक व कठीण होतो. संसर्गाच्या कारणामुळे मृतकाचे कलेवर अंतिम दर्शनासाठी घरी नेता येत नाही, तसेच गर्दी टाळण्यासाठी आप्त स्वकियांनाही बोलविता येत नाही. त्यामुळे अंतिम संस्कारावरही कोरोना नियमांचे बंधन आले आहे.

अशी होते प्रक्रिया

  • कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर मृतकाच्या नातेवाइकाला कळविले जाते
  • मृतदेहाला वैद्यकीय दक्षतेनुसार रॅपिग केले जाते
  • मृतदेह सर्वोपचारच्या शवागृहात ठेवला जातो
  • मृतकाच्या धर्मानुसार अंतिम संस्कार केले जावे यासाठी नातेवाइकांच्या सूचनेनुसार अंतिम संस्काराचे ठिकाण ठरविले जाते.
  • स्मशानभूमी किंवा कब्रस्थान निश्चितीनंतर रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जाते
  • अंतिम संस्कारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार पीपीई किट दिले जातात
  • दोन पीपीई किट रुग्णवाहिका चालक व मदतनीससाठी व दोन किट मृतकाचा अंतिम विधी करणाऱ्या नातेवाइकांसाठी असतात
  • नातेवाइकाच्या हस्ते विधीपूर्वक अंतिम संस्कार केले जातात

 कोरोनाबाधित रुग्णांच्या अंतिम संस्कारासाठी अकोला कच्छी मेमन जमातच्या वतीने चमू कार्यरत आहे. आता दोन पथक, दोन रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. मृतकाच्या धार्मिक पद्धतीनुसार त्यांच्या नातेवाइकांच्या हस्तेच अंतिम संस्कार केले जातात.- जावेद जकरियाअध्यक्ष, कच्छी मेमन जमात

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या