लोकमत न्यूज नेटवर्कबोरगावमंजू: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सांगळूद अंबादेवी येथील १५ वर्षीय बालकाचा बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना ५ जून रोजी दुपारी घडली. या प्रकरणी बोरगावमंजू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सांगळूद अंबादेवी येथील पवन मोहन सामरकर हा गावातील लोणार नदीच्या पात्रात गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. त्या पोहणे येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अरुण सिरसाट यांनी बोरगावमंजू पोलिसांना माहिती दिली. हेकॉ अरुण गावंडे, आंबेकर यांनी घटनास्थळावर भेट देउन पंचनामा केला. तसेच आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास बोरगामवंजू पोलीस करीत आहेत.
सांगळूद अंबादेवी येथील बालकाचा बुडाल्याने मृत्यू
By admin | Updated: June 6, 2017 00:56 IST