शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेचा मृत्यू; परिसेवकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:15 IST

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातील बालरोग विभागात उपचारार्थ दाखल असलेल्या बालिकेचा मृत्यू झाल्यामुळे क्रोधित झालेल्या नातेवाईकांनी उपचारात हलगर्जी केल्याचा आरोप करीत, कर्तव्यावर असलेल्या परिसेवकास मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देसवरेपचारमधील प्रकार अधिष्ठातांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातील बालरोग विभागात उपचारार्थ दाखल असलेल्या बालिकेचा मृत्यू झाल्यामुळे क्रोधित झालेल्या नातेवाईकांनी उपचारात हलगर्जी केल्याचा आरोप करीत, कर्तव्यावर असलेल्या परिसेवकास मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात न आल्यामुळे हे प्रकरण आपसात मिटल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.वाशिम जिल्हय़ातील मालेगाव तालुक्यातील राजश्री वाघमारे या तीन वर्षीय बालिकेस तीन दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे सवरेपचार रुग्णालयातील बालरोग विभागाच्या वार्ड क्र. २३ मध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी या बालिकेची तब्येत बिघडली व दुपारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मुलीचा मृत्यू झाल्यामुळे चिडलेल्या नातेवाईकांनी परिसेवक गायकवाड यांना मारहाण केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व परिसेवकांनी आपल्या मुलीकडे लक्ष न दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर परिसेवक गायकवाड यांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्याकडे तक्रार करून या प्रकाराची माहिती दिली.

अधिष्ठातांनी दिला चौकशीचा आदेशबालरोग विभागातील वार्ड क्र. २३ मध्ये उपचारार्थ भरती असलेल्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी परिसेवकास केलेल्या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचा आदेश प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी बालरोग विभागप्रमुख डॉ. विनीत वरठे यांना दिला आहे. चौकशी अहवालातून सत्य समोर येईल, असे डॉ. घोरपडे यांनी सांगितले.

राजश्री वाघमारे हिला उपचारासाठी आणले तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती. शरीरात पाणी झाल्याने तिला श्‍वास घेणेही मुश्किल होत होते. तिच्यावर उपचार करण्यात कोणतीही हलगर्जी करण्यात आली नाही. दरम्यान, बुधवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. - डॉ. विनीत वरठे, विभागप्रमुख, बालरोग विभाग.