शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वेळेवर उपचार न मिळाल्याने चिमुकलीचा मृत्यू; नातेवाईकांनी आरोग्य केंद्राल ठोकले कुलुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 18:00 IST

मळसूर (जि. अकोला) : वेळेवर उपचार न मिळाल्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ९ मार्च रोजी घडली.

ठळक मुद्देगावातील प्रकाश कंकाळ यांची मुलगी रिना कंकाळ हीला ताप आल्याने तिच्या वडिलांनी तिला मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.मुलीची प्रकृती बिघडत असल्याने मुलीच्या नोतवाईकांनी पुढील उपचारासाठी अकोला हालविण्यासाठी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेची मागणी केली.चिमुकलीला उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे हलविले. परंतु काही वेळातच उपचार दरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

मळसूर (जि. अकोला) : वेळेवर उपचार न मिळाल्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ९ मार्च रोजी घडली. मळसुर येथील रिना प्रकाश कंकाळ असे मृतक चिमुलीचे नाव आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने संतप्त झालेल्या रुग्ण चिमुकलीच्या नातेवाईकांनी केंद्राला कुलूप ठोकले.

गावातील प्रकाश कंकाळ यांची मुलगी रिना कंकाळ हीला ताप आल्याने तिच्या वडिलांनी तिला मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सकाळी ८.३० वाजता प्राथमिक आरोग्य केद्रात वैद्यकीय अधिकारीच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीची प्रकृती बिघडत असल्याने मुलीच्या नोतवाईकांनी पुढील उपचारासाठी अकोला हालविण्यासाठी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेची मागणी केली.परंतु त्यांना रुग्णवाहिकाही मिळाली नाही. यामध्ये बराच वेळ गेल्याने चिमुकलीला वेळेवर उपचार मिळाले नाही. अखेर नातेवाईकांनी खासगी वाहनाने चिमुकलीला उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे हलविले. परंतु काही वेळातच उपचार दरम्यान मुलीचा मृत्यू झाला.हलगर्जीपणाचा तिसरा बळीप्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांना मुख्यालयी राहण्याची एलर्जी आहे. रात्रीला वैद्यकीय अधिकारी नेहमीच गैरहजर असतात. दिवसा उशिरा येणे हलगर्जी करणे या कारणामुळे यापुर्वी सुध्दा वेळेवर उपचार न मिळाल्याने वेदांत कंकाळ व मानसी कंकाळ या बालकांचा तडफडून मृत्यु झाला आहे. मात्र, तरीही वरिष्ठ अधिकाºयांनी दखल न घेतल्याने हलगर्जीपणाचा आज तिसरा बळी गेला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर वरिष्ठ कारवाई करणार, असा संतप्त सवाल चिमुकलीच्या नातेवाईकांनी उपस्थित केला.रविवारी पल्स पोलीओ मोहिम राबवायची असल्याने मी रुग्णवाहीका दुरुस्त करण्यासाठी अकोला येथे गेला होते. तेथून परत घरी यायला उशीर झाला. त्यामुळे, शुकवारी सकाळी आरोग्य केंद्रात पोहचण्यास उशीर झाला. तोपर्यंत चिमुकलीला तिच्या नातेवाईकांनी अकोला येथे नेले होते.- डॉ. आसीफ शेख, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मळसुर

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरhospitalहॉस्पिटल