शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या मुलाच्या हाती सोपविला मृत्यूचा दाखला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 10:59 IST

सकाळीच जेवणाचा डबा दिला, तेव्हा वडिलांची तब्बेत ठीक असल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर रात्री हातात मृत्यूचा दाखला मिळाल्याने रुग्णाच्या मुलाला धक्काच बसला.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोनाचा उपचार सुरू असलेल्या वडिलांचा डबा घेऊन मुलगा रुग्णालयात जातो अन् त्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी रुग्णाच्या मुलाच्या हाती चक्क मृत्यूचा दाखला देतो. हा धक्कादायक प्रकार अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात घडला आहे, सकाळीच जेवणाचा डबा दिला, तेव्हा वडिलांची तब्बेत ठीक असल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर रात्री हातात मृत्यूचा दाखला मिळाल्याने रुग्णाच्या मुलाला धक्काच बसला.बुलडाणा जिल्ह्यातील सातगाव म्हसला गावातील ७० वर्षीय विठ्ठलसिंह जाधव यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर बुलडाण्यातच उपचार सुरू करण्यात आले होते; परंतु डॉक्टरांनी एक्सरे काढल्यानंतर त्यांना न्यूमोनिया असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणाही झाली.दरम्यान, वैद्यकीय चाचणी अहवालात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने त्यांना कोविड वार्ड क्रमांक २९ मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या सोबत मुलगा संदीप होता. संदीप जाधव हे वडिलांसाठी दररोज जेवणाचा डबाही घेऊन जात होते. नेहमीप्रमाणे त्यांनी शनिवारी सकाळी वडिलांसाठी जेवणाचा डबा नेला. यावेळी त्यांनी येथील कर्मचाºयाकडे वडिलांच्या तब्बेतीची चौकशी केली. वडिलांची तब्बेत ठीक असल्याचे कळल्यावर ते समाधानी झाले. त्याच दिवशी ते रात्रीचा डबा घेऊन गेले; मात्र त्यावेळी तुमचा रुग्ण येथे नाही, असे सांगत एका कर्मचाºयाने त्यांना डबा परत केला. वडिलांच्या उपस्थितीची चौकशी करताना एका वैद्यकीय कर्मचाºयानी त्यांच्या हाती थेट वडिलांच्या मृत्यूचा दाखलाच दिला. त्यामुळे संदीप जाधव यांना धक्काच बसला.

रुग्णाच्या नातेवाइकांसोबत संपर्क होत नाही, त्या रुग्णाचा मृतदेह शवगृहात सुरक्षित आहे. नियमानुसार, त्यांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीतच अकोल्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला जाईल. कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने जिल्हाबाहेर नेणे शक्य नाही. रुग्णांच्या नातेवाइकांनी योग्य संपर्क क्रमांक द्यावा म्हणजे असे प््नाकार टळतील.- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला.

शनिवारी रात्री वडिलांसाठी डबा घेऊन गेल्यावर त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी थेट मृत्यूचा दाखला हातात दिल्याने धक्का बसला. मृतदेहाची मागणी केली; मात्र अद्याप मृतदेह मिळाला नाही.- संदीप जाधव,मृत रुग्णाचा मुलगा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय