शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट बांधकामात फसल्याने बैलांचा मृत्यू; सरपंच, सचिवावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 13:13 IST

इंगळे यांनी दोन्ही बैलांवर उपचार केले; मात्र पायाला लोखंड तसेच सिमेंटमुळे गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील पुलाचे बांधकाम निकृष्ट करण्यात आले असून, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने पुलावर पडलेल्या खड्ड्यात गोविंदा इंगळे यांच्या बैलांचा पाय फसल्याने जखमा होऊन मृत्यू झाल्याची घटना २०१५ मध्ये घडली. याविरोधात गोविंदा इंगळे यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर सह दिवाणी न्यायाधीश यांनी अंत्री मलकापूरच्या सरपंच व सचिवावर कारवाई करण्याचा आदेश देत या दोघांनी गोविंदा इंगळे यांना ८० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश २६ नोव्हेंबर रोजी दिला.हा पूल निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी आधीच करण्यात आल्या होत्या; मात्र सरपंच व सचिवाची मिलीभगत असल्याने त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे इंगळे यांनी सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात पुराव्यानीशी दावा दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर अंत्री मलकापूर येथील सरपंच व सचिवाने हलगर्जी केली असून, निष्काळजीपणे कारभार चालविला आहे. त्यामुळे गोविंदा गोटीराम इंगळे यांच्या बैलांचा मृत्यू झाला असून, त्याची नुकसान भरपाई म्हणून येथील सरपंच व सचिवाने गोविंदा इंगळे यांना एका महिन्याच्या आत ८० हजार रुपये द्यावे तसेच २०१५ पासून ते आतापर्यंत ६ टक्के व्याजदराने रक्कमही देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी गोविंदा इंगळे यांच्यावतीने अ‍ॅड. चंद्रकांत वानखडे यांनी भक्कमपणे बाजू मांडली. तसेच निकृष्ट बांधकामाचे पुरावे व दस्तऐवजही अ‍ॅड. वानखडे यांनी न्यायालयात सादर केले. त्यामुळेच या प्रकरणात सरपंच व सचिवावर कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.अंत्री मलकापूर ते मोरझाडी या रस्त्यावर गोविंदा गोटीराम इंगळे यांचे शेत आहे. त्यामुळे ते त्यांच्या शेतात रोज बैलगाडी घेऊन जात होते. दरम्यान, शासनाने या रोडवरील एक पूल रोजगार हमी योजनेतून मंजूर करून त्याचे बांधकाम केले; मात्र सदरचे बांधकाम निकृ ष्ट दर्जाचे केल्याने या पुलावर मोठे खड्डे पडले. याच खड्ड्यांमुळे गोविंदा इंगळे यांच्या दोन्ही बैलांच्या पायाला जखमा झाल्या. इंगळे यांनी दोन्ही बैलांवर उपचार केले; मात्र पायाला लोखंड तसेच सिमेंटमुळे गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालयsarpanchसरपंच