शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती अर्ज सादरीकरणासाठी महाविद्यालयांना २० फेब्रुवारीपर्यंत मुदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 14:49 IST

महाविद्यालयांना महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करावे लागणार आहेत.

अकोला : शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क , परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने सादरीकरणासाठी महाविद्यालयांना २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महाविद्यालयांना महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करावे लागणार आहेत.शैक्षणिक सत्र २०१९-२० साठी महाडीबीटी प्रणालीवर अनुजाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुक्ल, परीक्षा शुक्ल योजनेचे अनेक अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. महाविद्यालयांनी हे प्रलंबित अर्ज जिल्हा लॉगीनवर सादर करण्यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली असून, अनेक महाविद्यालयांनी आॅनलाइन अर्ज सादर केली नाहीत. त्यामुळे समाजकल्याण कार्यालयाकडून २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संधीचा लाभ जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांनी घेऊन प्रलंबित अर्ज दिलेल्या मुदतीत शासन निर्णयानुसार पडताळणी करून जिल्हा कार्यालयाकडे पाठवावेत, दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर न केल्यास विद्यार्थी योजनेपासून वंचित राहतील. यासाठी महाविद्यालय जबाबदार राहणार असल्याने महाविद्यालयांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याणतर्फे करण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाScholarshipशिष्यवृत्ती