शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोलासह राज्यातील १४ ड महापालिकांना डीसी रूल लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 01:44 IST

अकोल्यातील ईमारती बांधकामांना मिळेल चालना; पाईंट एकने वाढ झाल्याने बिल्डर्सवर्गात आनंद.

अकोला, दि. २१: अकोलासह राज्यातील चौदा ड महापालिकांसाठी विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) लागू झाल्याने गत काही वर्षांपासून रखडलेल्या ईमारती बांधकांना चालना मिळणार आहे. नवीन डीसी रूलमध्ये चटई क्षेत्र (एफएसआय) पाईंट एकने वाढले असल्याने दहा टक्क्यांची वाढ झाली. तर प्रीमीअम भरल्यानंतर चटईक्षेत्र ३0 आणि त्यापेक्षाही जास्त टक्क्यांनी वाढणार असल्याने बिल्डर वर्गालाही बराच दिलासा मिळाला आहे. बिल्डरांसह डीसी रूलजा फायदा राज्याच्या महापालिकांच्या महसूल विभागाला देखील होणार आहे.जमिनीचे चटईक्षेत्र संपुष्टात येण्याचा धोका लक्षात घेत महाराष्ट्र राज्यातील १४ ड वर्ग महापालिकांसाठी नवीन विकास नियमावली तयार करण्याचे काम काही दिवसांपासून सुरू होते. यासाठी राज्यभरातून सूचना आणि हरकती मागविल्या गेल्या होत्या. पुणे येथील नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाने डीसी रूलचा अहवाल नगर विकास विभागाकडे सादर केला होता. चटईक्षेत्रात (एफएसआय) वाढ करण्याची मागणी शिवसेनेसह राज्यातील क्रेडाई संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केली होती. तेंव्हापासून अकोल्यासह राज्यातील १४ ड वर्गाच्या महापालिका डीसी रूलची प्रतीक्षा होती.डीसी रूल नुकताच लागू झाला आहे. २0९ पानांच्या या नियमावलींचा अभ्यास करायला जवळपास चार दिवस तरी लागतील. त्यानंतर ईमारती बांधकामांना मंजुरी दिली जाईल. मात्र ज्या बिल्डर्संनी आधीच चार पट अतिरिक्त बांधकाम केले आहे, त्यांचे बांधकाम मात्र पाडण्यात येईल. त्यामुळे महापालिका आणि बिल्डर दोघांसाठी डीसी रूल परिणामकारक ठरले.-अजय लहाने, महापालिका आयुक्त, अकोला.नियमावलीचे पॅरामीटर लावण्याची आमची अनेक वर्षांची मागणी होती. त्यामुळे राज्यभरात डीसी रूलचे स्वागतच होईल. जुन्या अनधिकृत ठरविलेल्या ईमारती नियमित करता येतील तर नवीन नियमानुसार होतील. महापालिकेने डीसी रूल संदर्भातील बारकावे समजावून सांगण्यासाठी बिल्डर्सची कार्यशाळा घेतली पाहीजे.-पंकज कोठारी, माजी उपाध्यक्ष, क्रेडाई, महाराष्ट्र.