शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूरात भरदिवसा घरफोडी;  २ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 20:05 IST

Burglary in Murtijapur सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ७७ हजार  ऐवज लंपास केल्याची घटना ११ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवंदना ज्ञानदेव खंडारे या आपले पती व दोन मुलांसह राहतात.लहान मुलगा शाळेतून घरी परत आला तेव्हा घराचे कुलूप तुटलेले आढळून आले.

मूर्तिजापूर : येथील महाकाली नगरातील भरदुपारी अज्ञात चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ७७ हजार  ऐवज लंपास केल्याची घटना ११ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.            मिळालेल्या माहितीनुसार येथील महाकाली नगरात राहणाऱ्या फिर्यादी वंदना ज्ञानदेव खंडारे या आपले पती व दोन मुलांसह राहतात. घटनेच्या दिवशी त्या बँकेच्या कामानिमित्ताने दुपारी १२ वाजता बाहेर गेल्या होत्या.  तर पती व मोठा मुलगा खेड्यात असलेल्या शेतावर तर लहान मुलगा शाळेत गेला होता.  दुपारी लहान मुलगा शाळेतून घरी परत आला तेव्हा घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. दुपारी १२ ते २ घरी कोणीच नसल्याने अज्ञात चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून आतमधे प्रवेश केला, घरात असलेले कपाट चोरट्यांनी तोडले व कपाटात ठेवले सोन्याचे एक नेकलेस, गहू पोत, एक मीनी व मोठे मंगळसूत्र, कानातले तीन-चार जोड व अंगठी यासह २ लाख ४७ हजाराचे सोन्याचे दागिने त्याच बरोबर शेती कामासाठी घरात ठेवलेले ३० हजार रुपये नगदी असा २ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केला.  अज्ञात चोरट्यांचा तपास लावण्यासाठी श्वानपथक व फिंगर प्रिंट्स पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने अज्ञात चोरट्यांचा सुगावा घेत सोनाळा रस्त्यापर्यंत धाव घेतली; परंतु तेथून चोरट्यांनी वाहनाने पळ काढला असल्याने तेथून श्वान पुढे सरकले नसल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासंदर्भात मुर्तिजापूर शहर पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी