शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरतीसाठी ‘तारीख पे तारीख’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:50 IST

गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या शिक्षक भरतीसाठी शासनाला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे.

- संदीप वानखडेअकोला: पसंतीक्रम नोंदविल्यानंतर गुणवत्ता यादी व नियुक्तीची प्रतीक्षा करणाºया अभियोग्यताधारकांना पुन्हा एकदा तारीख मिळाली आहे. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीसाठी जवळपास ८५ हजार अभियोग्यताधारकांनी पसंतीक्रम नोंदविले आहेत. जून महिन्यात उमेदवारांची नियुक्ती करण्याची घोषणा शासनाने केली होती; मात्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे जुलैअखेरही गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात शासनाला अपयश आले आहे. पवित्र पोर्टलवर उमेदवारांसाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. २ आॅगस्ट रोजी उमेदवारांच्या निवडीविषयी पुन्हा सूचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या शिक्षक भरतीसाठी शासनाला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. पसंतीक्रम भरण्यामध्ये जवळपास दीड महिन्याचा वेळ गेल्यानंतर आता अभियोग्यताधारकांना निवड यादी लागण्याची प्रतीक्षा आहे. जून २०१९ पर्यंत शिक्षक भरती पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन पूर्णपणे फसले असून, जुलैअखेरही केवळ तारीख मिळत असल्याने अभियोग्यताधारकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. शिक्षकांची भरती पारदर्शी करण्याच्या उद्देशाने शासनाने पवित्र पोर्टलमार्फत भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही शिक्षक भरती या ना त्या कारणाने रखडलेली आहे. आचारसंहितेमुळे थांबलेले पवित्र पोर्टलचे काम मे महिन्यात सुरू करण्यात आले होते. प्राध्यान्यक्रम कसे भरावे, याविषयी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्यानंतर २२ मेपासून प्रत्यक्षात प्राध्यान्यक्रम भरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा १ जूनपासून प्राधान्यक्रम उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर वारंवार सूचना देऊनही ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरले नाही, त्यांच्यासाठीही शासनाने तीन दिवस उपलब्ध करून दिले. त्यामुळे शिक्षक भरतीला शासन जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा आरोप अभियोग्यताधारकांनी केला आहे. शासनाने सामाजिक आरक्षणाविषयी शासनादेश जारी केल्याने शिक्षक भरती पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे आहेत. शिक्षक भरती आणखी लांबण्याची चिन्हे दिसताच अभियोग्यताधारकांनी शिक्षणमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. अभियोग्यताधारकांचा रोष कमी करण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टलवर पुन्हा एकदा सूचना जारी केल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeachers Recruitmentशिक्षकभरती