शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

वाहतूक शाखेने काढले धोकादायक लोखंडी फलक ; सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:16 IST

अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राष्ट्रीय महामार्गावर नेहरू पार्कनजीक वाहनचालकांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी लावण्यात आलेला लोखंडी माहिती फलक तुटल्याने हा फलक एखाद्या वाहनावर पडण्याचा धोका असतानाच वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील व कर्मचाऱ्यांनी हा फलक शुक्रवारी काढला.

ठळक मुद्देएक लोखंडी मोठा फलक जेल चौकात महामार्गावर तुटल्याने तो लोंबकळत होता.कर्तव्यावर असलेले शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी यांचे त्याकडे लक्ष गेले. त्यांनी समयसूचकता दाखवित तो लोखंडी फलक मोठ्या ट्रेलरच्या साहाय्याने खाली उतरविला.

अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राष्ट्रीय महामार्गावर नेहरू पार्कनजीक वाहनचालकांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी लावण्यात आलेला लोखंडी माहिती फलक तुटल्याने हा फलक एखाद्या वाहनावर पडण्याचा धोका असतानाच अकोला वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील व कर्मचाऱ्यांनी हा फलक शुक्रवारी काढला. यासाठी एका मोठ्या ट्रकचे साहाय्य घेण्यात आले होते.सार्वजिक बांधकाम विभागाने अमरावती ते खामगाव या राष्ट्रीय महामार्ग सहावर प्रमुख चौका-चौकांत वाहन चालकांच्या व नागरिकांच्या माहितीसाठी विविध फलक लावली आहेत. असाच एक लोखंडी मोठा फलक जेल चौकात महामार्गावर तुटल्याने तो लोंबकळत होता. यावेळी हवा सुटल्याने तो एका वाहनचालकाच्या अंगावर कोसळण्याचा धोका असतानाच यावेळी कर्तव्यावर असलेले शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी यांचे त्याकडे लक्ष गेले. त्यांनी समयसूचकता दाखवित तो लोखंडी फलक मोठ्या ट्रेलरच्या साहाय्याने खाली उतरविला. या धोकादायक फलकांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा फलकामुळे एखाद्या वाहन चालकाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस