शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात कोविडच्या नव्या स्ट्रेनचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 10:28 IST

Covid's new strain in Akola ७५ कोविड रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीकडे पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देअहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत प्राप्त होणार आहे. फैलावाची गती लक्षात घेता नव्या स्ट्रेनचा धोका नाकारता येत नाही.

अकोला: कोरोना संसर्गाच्या फैलावाचा वेग पाहता जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या म्युटेट स्ट्रेनचा धोका वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने खबरदारी घेत आरोग्य विभागातर्फे ७५ नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. नमुन्यांचे तपासणी अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत प्राप्त होणार आहे. त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील मुर्तिजापूर, अकोटसह महापालिका क्षेत्रातील काही भागात कोरोनाचे नवे हाॅटस्पॉट निर्माण होऊ लागले होते, मात्र गत आठवडाभरात रुग्णवाढीचा वेग झापाट्याने वाढत गेला. अकोल्यासह शेजारच्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील कोराेनाचा कहर सुरूच आहे. दरम्यान, अमरावती येथे कोरोनाचा नवा म्युटेट स्ट्रेन असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने येथील काही कोविड रुग्णांचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पुणे येथील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले. अकोल्यातील रुग्णांमध्येही जनुकीय बदल झालेल्या कोरोना विषाणू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी बाळगत आरोग्य विभागातर्फे गुरुवारी रात्री ७५ कोविड रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीकडे पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचा तपासणी अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत प्राप्त होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

कोविड संसर्गात हा आहे बदल

पूर्वीचा कोरोना

कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला चार ते पाच दिवसानंतर लक्षणे दिसायची

सर्दी, कोरडा खोकला, धाप लागणे.

ताप येणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे.

संसर्गाचा वेग कमी

म्युटेट स्ट्रेन

कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला २४ तासांतच लक्षणे दिसायला लागतात.

सर्दी, कोरडा खोकला, धाप लागणे,

ताप येणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे.

ससर्गाचा वेग जास्त

 

मास्क हीच सुरक्षेची ढाल

कोरोना संसर्गाचा झपाट्याने फैलाव होत असून, नव्या स्ट्रेनचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:च्या संरक्षणासाठी सुरक्षेची ढाल म्हणून मास्कचा वापर करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या फैलावाची गती लक्षात घेता नव्या स्ट्रेनचा धोका नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून ७५ कोविड रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही कडे पाठविण्यात आले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत तपासणीचे अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला