शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचा-यांवर लागणार चाप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 01:41 IST

१५ दिवसांत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये बायोमेट्रिक हजेरीची होणार अंमलबजावणी.

अकोला: ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या म्हणून आरोग्य सेवा सुधारण्यावर राज्य शासनाने भर दिला. त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतील दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचार्‍यांवर चाप लावण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचार्‍यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविली जाणार आहे. ग्रामीण भागात तातडीने आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत संचालित प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाकडून जनतेला मोठय़ा अपेक्षा असतात; मात्र गरजू रुग्णांना वेळेव उपचार मिळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य कर्मचारीच उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला शहरातील आरोग्य सेवांचा आधार घ्यावा लागतो. त्यात वेळेची आणि पैशांचीही हानी होते. याशिवाय वेळेवर उपचार न मिळाल्याने आजार गंभीर झाल्याचे प्रकारही घडतात. सुविधा असूनही केवळ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्यामुळे आरोग्य सेवांवर होणारे विपरीत परिणाम राज्य शासनाची आणि आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन करणारा ठरत आहे. त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही सक्षमपणे काम करीत नसल्याने आता राज्य शासनाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपजिल्हा रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविण्याचा आदेश २३ मार्च रोजी देण्यात आला.