शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटीमुळे तुर, हरभरा, फळबागांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 19:02 IST

Agriculture News : २ हजार ६०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

-संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यात २ हजार ६०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

किनखेड, कामठा, मुरंबा, शिवण खुर्द, कमळणी, कमळखेड, निंबा, मोहखेड, खांदला, धोत्रा, कानडी, शेंद, उमरी अरब या भागाला गारपीटीचा जबर तडाखा बसला असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यासह शहरात मंगळवारी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, तुर, कांदा व फळबाग पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भात काही जिल्ह्यांत गारपिटीसह प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. दरम्यान २८ डिसेंबर रोजी दुपारी वीजांच्या कडकडाट गारपीटीसह पावसाने जोरदार झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे  शेतकऱ्यांची तारांबळ उडाली तालुकयातील अनेक शेतकऱ्यांनी तुरीची कापणी सुरूवात होण्यापूर्वीच पावसाने व गारपीटीने तुरीला वाळलेल्या शेंगा फुटून शेतात सर्वत्र दाणे विखुरल्याने दाण्यांचा सडा असल्याचे चित्र आहे. त्याच बरोबर हरभरा, गहू, कांदा पिके जमिनदोस्त झाली आहे तर फळबागांचे फळे व आलेला बार पडल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.  तालुक्यातील मौजे किनखेड, शिवण, कामठा, मुरंबा, अनभोरा, कमळणी कमळखेड, निंबा, धोत्रा, धानोरा पाटेकर, शेंद, बिडगाव, शिवण खुर्द, मोहखेड, अनभोरा, कानडी, उमरी अरब या परीसरातील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. तर निंबा येथे गुरांच्या गोठ्यावर झाड उन्मळून पडल्याने गोठ्यात बांधलेली गुरे गंभीर जख्मी झाली आहेत खांदला येथे आवळा व लिंबाचा आकाराची गार पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेती