शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशीचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 19:36 IST

मूर्तिजापूर तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशी पिक  बोंडअळीने प्रभावीत झाले आहे. उडीद, मूंग, सोयाबीन पिकतर हातातुन गेलेच  शिवाय पांढर्‍या सोन्यालाही लालबोंड अळीने भुईसपाट केल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे. 

ठळक मुद्देबियाणे कंपन्यांविरुद्ध शेतकरी आक्रमक तालुक्यातील शेतकर्‍यांनी यंदा मोठय़ा  प्रमाणात कपाशीचा पेरा केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर :  तालुक्यातील शेतकरी लाल बोंडअळीमुळे पूर्ता त्रस्त झालेला  आहे. शेतीला लावलेला खर्चही हाती न मिळाल्यामुळे शेतातील हजारो  एकरवरील कपाशीच्या पिकांवर रोडावेटर फिरुन कपाशीचे पिक शेतातून हद्द पार केलेले आहे. तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशी पिक  बोंडअळीने प्रभावीत झाले आहे. उडीद, मूंग, सोयाबीन पिकतर हातातुन गेलेच  शिवाय पांढर्‍या सोन्यालाही लालबोंड अळीने भुईसपाट केल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी यंदा मोठय़ा  प्रमाणात कपाशीचा पेरा केला. चालु हंगामी वर्षात अत्यअल्प प्रमाणात पाऊस  पडला. मात्र, ज्या शेतकर्‍यांकडे मुबलक पाण्याची सोय आहे, अशांनी पिकाला  पाणी देवून पिक उभे केले. कपाशीच्या एका झाडाला जवळ जवळ ३0 ते ३५  बोंड लागली. पण कापूस काही फुटत नसल्याने शेतकर्‍यामध्ये शंकेची पाल  चुकचुकली. प्रत्येक शेतकर्‍यांनी आपआपल्या शेतातील कपाशीच्या बोंडाची  पाहणी केली असता त्यामध्ये कापूस तर सोडाच सर्वत्र लालबोंड अळीच दिसुन  आली. बिटी कंपनीने कपाशीचे बोगस बियाणे देवून शेतकर्‍यांची चक्क  फसवणूक केली असल्याचे प्रत्यक्षदश्री पहावयास मिळाले. सिरसो, जांभा खु., शेलूं बोंडे आदी भागातील नागरिक शेतकर्‍यांनी पैशाची  जुळवाजुळव करुन कपाशीचे पिक उभे केले. पूर्वीच उडीद, मूग, सोयाबीन  िपकांचे झालेल्या अत्यल्प उत्पादनामुळे नुकसानीमुळे खर्चही न निघाल्याने ह तबल झालेल्या शेतकर्‍यांवर बोंडअळीमूळे आस्मानी संकट कोसळले. राज्य  शासनाने झालेल्या नुकसानाची पाहणी करुन नुकसान भरपाई मिळवून  देण्यासाठी शेतकर्‍यांनी जिवाचा आटापिटा केला. मात्र, त्यांना  आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. निवडणूकीपूर्वी पंतप्रधान व मुख्यमंत्री  यांनी शेतकर्‍यांना हमीभाव आणि पिकाला भाव मिळवून देण्याची हमी दिली हो ती. त्यालाही तिन वर्ष उलटली तरीही शेतकरी व आम जनतेचे ‘अच्छे दिन’  आलेच नाही. बीटी कपाशीच्या बोगस बियाण्याची चौकशी करुन शासनाने  कनपनी विरोधात दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी मुर्तिजापूर तालुक्या तील शेतकर्‍यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री पांडूरंग  फुंडकर यांच्याकडे एक निवेदन देवून केली आहे. -

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरcottonकापूस