अकोला : अहमदनगर जिलतील नेवासा, खर्डा, पाथर्डी या तालुक्यांत घडलेल्या दलित हत्याकांडाचे भीषण स्वरूप जुन्या व नव्या सत्ताधिकार्यांनी नजरेआड केल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी गुरुवारी येथे पत्रपरिषदेत केले. तसेच याकडे पंतप्रधानांनी लक्ष देण्याची मागणी त्यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली. आढावा म्हणाले, देशात सत्तांतर झाले आहे, मात्र परिवर्तन कितपत होईल याबाबत शंका असून, सामाजिक विषमता आक्रमक रूप धारण करीत असल्याचा त्यांनी आरोप केला. अहमदनगर जिलतील तीनही ठिकाणी झालेल्या हत्याकांडांमध्ये सारख्याच पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. यामागे संघटित शक्तीचा हात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. अल्पसंख्याक मुस्लीम, ख्रिश्चनांवरील हल्लय़ाचे प्रमाण वाढत आहे. नवे राज्यकर्ते याला आळा घालणार की गुजरातप्रमाणेच चिथावणी देणार, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. शासनाने हमाल व असंघटित गरीब कामगारांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी आढाव यांनी केली.
दलितांवरील हल्लयांकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष!
By admin | Updated: October 31, 2014 00:32 IST