शहरं
Join us  
Trending Stories
1
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
2
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! मुळात पडळकर हा विषय अत्यंत गंभीर...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
13
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
14
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
15
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
16
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
17
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

गरिबांच्या जेवणातील प्रथिनांवर घाला; डाळ मिळणार आता केवळ एक किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:22 IST

अकोला: सार्वजनिक व्यवस्था अंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना प्रतिमहा तूर व हरभरा यापैकी एक डाळ एक किलो वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १ मार्च रोजी घेण्यात आला. प्र

- संतोष येलकरअकोला: सार्वजनिक व्यवस्था अंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना प्रतिमहा तूर व हरभरा यापैकी एक डाळ एक किलो वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १ मार्च रोजी घेण्यात आला. प्रतिमहा केवळ एक किलो डाळ वितरित करण्यात येणार असल्याने, गरीब शिधापत्रिकाधारकांच्या जेवणातील प्रथिनांवर घाला घालण्यात आला आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना यापूर्वी दरमहा तूर, हरभरा व उडीद इत्यादी डाळींचे प्रत्येकी एक किलोप्रमाणे रास्त भाव दुकानांमधून वितरण करण्यात येत होते. १ मार्च २०१९ रोजीच्या शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार, आता सार्वजनिक व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रतिमहा तूर डाळ व हरभरा डाळ या दोन डाळींपैकी एक डाळ प्रत्येकी एक किलोप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. डाळीचे वितरण कमी करण्यात आल्याने, गरिबांच्या जेवणातील डाळीचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे प्रतिमहा केवळ एक किलो डाळ वितरण करण्याचा शासनाचा हा निर्णय गरीब शिधापत्रिकाधारकांच्या जेवणातील प्रथिनांवर घाला घालणारा ठरणार आहे.तूर डाळीच्या दरात २० रुपयांची वाढ!सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ प्रतिकिलो ५५ रुपये व हरभरा डाळ ४५ रुपये प्रतिकिलो दराने वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ ३५ रुपये प्रतिकिलो दराने वितरित करण्यात येत होती. आता ही डाळ ५५ रुपये प्रतिकिलो दराने वितरित करण्यात येणार असल्याने, रास्त भाव दुकानांमधून वितरित होणाऱ्या तूर डाळीच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य