शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

सेवा व उत्पादनाचा लाभ घेताना ग्राहकांनी दक्षता बाळगावी - नरेंद्र टापरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 16:05 IST

अकोला: ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. ग्राहकांनी सेवा वउत्पादनाचा लाभ घेताना दक्षता बाळगावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांनी मंगळवारी येथे केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.श्रीमती एस.एम.उंटवाले यांनी प्रशासन व ग्राहक संघटनांनी समन्वय साधुन प्रसंगी ग्राहकमंच मध्ये प्रकरण दाखल करुन ग्राहक चळवळ राबवावी, असे सांगितले.

अकोला: ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. ग्राहकांनी सेवा वउत्पादनाचा लाभ घेताना दक्षता बाळगावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्राहक मंच अकोलाच्या अध्यक्षा एस.एम.उंटवाले होत्या. कार्यक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, अ.भा. ग्राहक पंचायत चे श्रीराम ठोसर, सुधाकर जकाते, आर. डी. अहिर अखिल भारतीय ग्राहक संरक्षण परिषदचे अध्यक्ष मनोहर गंगाखेडकर, ग्राहक संघटनेचे प्रतीनिधी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती एस.एम.उंटवाले यांनी प्रशासन व ग्राहक संघटनांनी समन्वय साधुन प्रसंगी ग्राहकमंच मध्ये प्रकरण दाखल करुन ग्राहक चळवळ राबवावी, असे सांगितले. ठोसर यांनी ग्राहक संघटनांचे सदस्य तसेच पदाधिकारी हे ग्राहकांच्या हितासाठी सर्वोतापरी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच ग्राहकांनी आपल्या हक्का करीता न घाबरता लेखी स्वरुपात तक्रार देण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी प्रशासन व ग्राहक संघटनांनी समन्वय साधुन प्रंसगी ग्राहक मंच मध्ये प्रकरण दाखल करुन ग्राहक चळवळ राबवावी असे विचार मनोहर गंगाखेडकर, सुधाकर जकाते आर. डी. अहिर यांनी मांडले. शासकीय यंत्रणेकडून बी.एस.एन.एलचे राजेश सोनवणे, महावितरणच्या स्वाती जाधव, व अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत अस्वार यांनी ग्राहकांना वजनमापे तसेच औषधे या बाबत आवश्यक ती माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी तर प्रास्तावीक सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी औदूंबर पाटील यांनी केले. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी आभार व्यक्त केले.विविध विभागांचे स्टॉलयावेळी श्री. सदगुरू इंडेन गॅस कंपनी,अकोला गॅस एजन्सी, स्वच्छ भारत मिशन, भारत संचार निगम लिमीटेड, महावितरण, वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांनी जनजागृती साठी माहितीपर स्टॉल लावले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय