अकोला - जठारपेठ येथील महिलेच्या पर्समधील ५ हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीनही महिला चोरटयांना खदान पोलिसांनी सोनसाखळी चोरीप्रकरणी अटक केली. या तीनही महिलांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. गोरक्षण रोडवरील रहिवासी ज्ञानदेवी विक्रमजित शुक्ला या १४ जून रोजी संत गजानन महाराज यांच्या पायदळ पालखी सोहळय़ात दर्शनासाठी गेल्या असता रेल्वे स्टेशन समोरील भागात रहिवासी असलेल्या मीना नन्ना हातगंडे, सोनी रवी चाकर आणि गंगा सुभाष नाने या तीन महिला चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे २0 ग्रॅमची सोनसाखळी लंपास केली होती. ज्ञानदेवी शुक्ला यांनी या तीनही महिला चोरट्यांना ओळखले असल्याने या प्रकरणी खदान पोलिसांनी तीनही महिलांना अटक केली. खदान पोलिसांनी आवश्यक ते दस्तावेज न्यायालयामध्ये सादर केल्यानंतर या तीनही महिला चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने महिलांना १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तीनही महिला चोर खदान पोलिसांच्या कोठडीत
By admin | Updated: July 5, 2016 01:16 IST