शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक आक्रमण, कलेचे व्यावसायिकरणामुळे लोककला संकटात - प्रा. डॉ. दिलीप अलोणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:24 IST

लोककलेला राजाश्रय नाही आणि आताच्या तरूणांमध्ये लोककला शिकण्याची गरज वाटत नाही. झटपट अभिनय करून पैसा मिळविण्याकडे सध्याच्या कलावंताचा कल आहे. अशी खंत भारतीय कलावंत परिषदेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध नकलाकार प्रा. डॉ. दिलीप अलोणे(वणी)यांनी व्यक्त केले. 

- नितीन गव्हाळे

अकोला: सांस्कृतिक आक्रमण वाढले आहे. कला क्षेत्रातून लोकजागृती ही परंपरा मागे पडून त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे लोककला संकटात सापडली आहे. लोककलेला राजाश्रय नाही आणि आताच्या तरूणांमध्ये लोककला शिकण्याची गरज वाटत नाही. झटपट अभिनय करून पैसा मिळविण्याकडे सध्याच्या कलावंताचा कल आहे. अशी खंत भारतीय कलावंत परिषदेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध नकलाकार प्रा. डॉ. दिलीप अलोणे(वणी)यांनी व्यक्त केले.  संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्यावतीने शिवाजी महाविद्यालयात आयोजित युवा महोत्सवामध्ये परिक्षक म्हणून ते अकोल्यात आले आहेत.  त्यांनी शुक्रवारी लोकमतसोबत संवाद साधला. प्रश्न: पूर्वीच्या आणि आताच्या युवा महोत्सवामध्ये काय बदल झाला?उत्तर: मी १९८५ पासून विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये काम करतो आहे. त्यावेळेस कलेची फारसी जाण नव्हती. मोजकेच तरूण-तरूणी युवा महोत्सवात सहभागी व्हायचे. परंतु विद्यापीठाचा आणि महाविद्यालयांचा विस्तार झाला आहे. संख्या वाढली. आता तुलनेने सुविधा उपलब्ध आहेत. युवा कलावंत गुणी आहेत. त्यांच्या मनात असलेली सामाजिक जाणीव, वास्तवातील प्रश्न ते व्यासपीठावर व्यक्त करीत आहेत. अंतरभावना मोकळीत करून देणारं युवा महोत्सव हे मोठे व्यासपीठ आहे. यातून अनेक कलावंत घडले आहेत. पुसदच्या ग्रामीण भागातील अंकूर वाढवे नावाचा कलावंत चला हवा येऊ द्या च्या व्यासपीठावर झळकला. ही युवा महोत्सवाची देण आहे. महाविद्यालय, प्राध्यापकांनी कला जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, तयारी करून घेण्याची गरज आहे.प्रश्न: नकला हा कोणता प्रकार आहे?उत्तर: नकला ही विदर्भाचा अत्यंत लोकप्रिय लोककला आहे. मनोरंजनातून समाजातील कु-प्रथा, रूढी, परंपरा यावर प्रहार करून लोकजागृती करावी. नकलांच्या माध्यमातून मार्मिक भाष्य करून जनजागृती करता येते.प्रश्न: नकला करण्याची प्रेरणा कशी मिळाली?उत्तर: विदर्भात स्व. नाना रेटर हे मोठे नकलाकार होते. पूर्वी गणेशोत्सव, दुर्गाउत्सवामध्ये नकलांचे कार्यक्रम व्हायचे. त्यांचा चंद्रपुरात असाच कार्यक्रम होता. परंतु त्यांना यायला उशिर झाल्यामुळे मला संधी मिळाली आणि मी काही नकला सादर केल्या. त्यांनी त्या नकला पाहिल्या. कौतुक केले आणि त्यातून माझ्यातील नकलाकार उदयास आला.प्रश्न: कला क्षेत्रात किती वर्षांपासून कार्यरत आहात?उत्तर: १९७२ पासून कला क्षेत्रात काम करतो आहोत. उपेक्षित कलावंतासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १९८४ मध्ये भारतीय कलावंत परिषदेची स्थापना केली. नकला कला प्रकारासाठी पहिल्यांदा शासनाचा पुरस्कार मिळाला. तसेच भारत सरकारच्या दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र नियामक मंडळाचा सदस्य म्हणूनही काम केले आहे. साक्षरतेवर अक्षर किमया, शेतकरी आत्महत्येवर गर्भात मातीच्य हा चित्रपट काढला. अशोक पवार यांच्या बिºहाड कादंबरीवर लघुपटाची निर्मिती केली.प्रश्न: नकला आणि मिमिक्रीमध्ये काय फरक आहे?उत्तर: मिमिक्री ही नेते, अभिनेते किंवा कोणाचीही करता येते. आवाजाची, देहबोलीची नक्कल म्हणजे मिमिक्री. नकला ही लोककला करमणूक करणारी बहुरूपी आणि जागृती करणारी कीर्तन परंपरा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक