शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूती शस्त्रक्रियेत हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 15:24 IST

अकोला - सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी रुग्णालयात डॉ. दीपिका आशिष संघवी यांनी प्रसूतीसाठी केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा केल्याने महिलेचा मृत्यू झाला. यावरून सदर डॉक्टरविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा बुधवारी दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देखालेदा बी जाफर बेग (३२) या गर्भवती असल्याने त्यांना ४ मार्च रोजी शास्त्री नगरातील डॉ. दीपिका आशिष संघवी यांच्या संघवी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.शस्त्रक्रियेनंतर त्यांना एक मुलगी झाली. मात्र, प्रसूतीनंतर खालेदा बी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. हलगर्जीमुळे खालेदा बी यांच्या शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्यां  दोन नस कापल्या गेल्याचे समोर आले.

अकोला - सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी रुग्णालयात डॉ. दीपिका आशिष संघवी यांनी प्रसूतीसाठी केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा केल्याने महिलेचा मृत्यू झाला. यावरून सदर डॉक्टरविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा बुधवारी दाखल करण्यात आला आहे.खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी खालेदा बी जाफर बेग (३२) या गर्भवती असल्याने त्यांना ४ मार्च रोजी शास्त्री नगरातील डॉ. दीपिका आशिष संघवी यांच्या संघवी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिझर न करता नॉर्मल प्रसूती करावी, अशी खालेदा बी यांच्या नातेवाईकांनी डॉ. संघवी यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार डॉक्टर दीपिका संघवी यांनी सायंकाळपर्यंत वाट बघू, असे सांगितले. सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी खालेदा बी यांच्या पोटात बाळ फिरले असल्याचे कारण देत डॉ. संघवी यांनी प्रसूती शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार खालेदा बी यांच्या नातेवाईकांनी त्यांना शस्त्रक्रियेसाठी संमती दिली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना एक मुलगी झाली. मात्र, प्रसूतीनंतर खालेदा बी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संघवी रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या मेमोवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र खालेदा बी यांच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवचिच्छेदन करण्यात आले. एक महिन्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. या अहवालानुसार प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचे स्पष्ट झाले. या हलगर्जीमुळे खालेदा बी यांच्या शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्यां  दोन नस कापल्या गेल्याचे समोर आले. त्यामुळे अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले. यावरून सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात डॉ. दीपिका आशिष संघवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCivil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन