शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात केवळ २६ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 10:26 IST

१ लाख १५ हजार ६१९ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असून, पावसाळा सुरू झाला असताना ४ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ २६ हजार ८८१ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १ लाख १५ हजार ६१९ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर १ एप्रिलपासून सुरू होणारे कर्जाचे वाटप रखडले होते. २६ एप्रिलपासून जिल्ह्यात बँकांमार्फत शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. शेतकरी अडचणीत असल्याच्या परिस्थितीत पावसाळा सुरू झाला असताना, पीक कर्ज वाटपासंदर्भात निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत १ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ २६ हजार ८८१ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित १ लाख १५ हजार ६१९ शेतकºयांकडून कर्ज केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.

पेरणीची तयारी सुरू; पीक कर्ज केव्हा मिळणार?पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात शेतकºयांनी खरीप हंगामातील पेरणीची तयारी सुरू केली असून, पेरणीसाठी लागणारे बियाणे व खते खरेदीची लगबग सुरू झाली असताना, ४ जूनपर्यंत जिल्ह्यातील केवळ २६ हजार ८८१ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पेरणीची तयारी सुरू झाली असली तरी कर्जापासून वंचित असलेल्या शेतकºयांना पीक कर्ज मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उद्दिष्ट १,१४० कोटींचे; कर्ज वाटप २६४ कोटी!यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट करण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत जिल्ह्यातील २६ हजार ८८१ शेतकºयांना २६४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना कर्ज वाटपाचे काम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २६ हजार ८८१ शेतकºयांना २६४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.- आलोक तारेणियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी