शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात पीक कर्जाचे वाटप निराशाजनक : कृषी राज्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 13:24 IST

अकोला : खरीप हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्याच्या कामात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीक कर्ज वाटपाची कामगिरी निराशाजनक असल्याच्या मुद्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करणार असल्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी येथे दिला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित खरीपपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांच्या निराशाजनक कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार असल्याचा इशारा दिला. या आढावा बैठकीला अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अकोला : खरीप हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्याच्या कामात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीक कर्ज वाटपाची कामगिरी निराशाजनक असल्याच्या मुद्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करणार असल्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी येथे दिला.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित खरीपपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार रणधीर सावरकर, आमदार बळीराम सिरस्कार, राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, बुलडाण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे उपस्थित होते. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत खरीप हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आणि आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या पीक कर्ज वाटपाचा जिल्हा व बँकनिहाय आढावा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतला. त्यामध्ये खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या, तरी विभागातील पाचही जिल्ह्यांत राष्ट्रीयीकृत बँकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अद्याप अत्यल्प असून, कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांना अत्यंत कमी पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची बाब समोर आली. त्यानुषंगाने पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांच्या निराशाजनक कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार असल्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला. या आढावा बैठकीला अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.आठवडाभरात सुधारणा करा; दिरंगाई केल्यास कारवाई!पीक कर्ज वाटपाच्या कामात आठवडाभरात बँकांनी सुधारणा करावी, अन्यथा संबंधित बँकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, तसेच पीक कर्ज वाटपाच्या कामात कुचराई करणाºया अधिकाºयांवर संबंधित बँक अधिकाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. येत्या दहा दिवसांत राष्ट्रीयीकृत बँकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांमध्ये रोष; बँकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला!पीक कर्ज वाटपाची गती बघता, पाचही जिल्ह्यांत पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत शंका असल्याच्या परिस्थितीत शेतकºयांमध्ये रोष वाढत असून, ही गंभीर बाब आहे. यासंदर्भात बँकांनी आत्मपरीक्षण करून शेतकºयांना जलदगतीने पीक कर्ज वाटप करण्याचा सल्ला कृषी राज्यमंत्र्यांनी बँकांना दिला.

 

टॅग्स :AkolaअकोलाSadabhau Khotसदाभाउ खोत