शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम कर्जखात्यात जमा केल्यास फौजदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 14:53 IST

अकोला : पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडून व विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केल्यास संंबंधित बँक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.

ठळक मुद्दे शासनाकडून आणि विमा कंपनीकडून प्राप्त होणाºया अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत.त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला आहे.

- संतोष येलकर

अकोला : पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडून व विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केल्यास संंबंधित बँक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडून आणि विमा कंपनीकडून प्राप्त होणाºया अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम संबंधित शेतकºयांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येऊ नये, असे शासनाचे सक्त आदेश आहेत; परंतु जिल्ह्यातील काही बँकांमध्ये शासनाकडून व विमा कंपनीकडून शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शासनाकडून आणि विमा कंपनीकडून शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात आल्यास, त्यासंदर्भात संबंधित बँक अधिकाºयांना जबाबदार ठरवून, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला आहे.

शासन निर्देशाकडे दुर्लक्ष; ही शोभणारी बाब नाही!शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्यात येऊ नये, असे शासनाचे सक्त निर्देश असताना, शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तक्रारी गंभीर स्वरुपाच्या असून, अशा कार्यप्रणालीमुळे शासन निर्देशाच्या अंमलबजावणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येते. अशा वर्तणुकीमुळे शेतकरी वर्गात शासनाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे ही बाब शोभणारी नाही, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

शासन निर्देशानुसार पीक विमा व नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकºयांच्या खात्यात जमा केलेली रक्कम कपात करून शेतकºयांच्या कर्ज खात्यात जमा केल्यास संबंधित बँक अधिकाºयांना जबाबदार ठरवून, फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांना मी आदेश दिला आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी, अकोला 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी