शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सातही ‘बीडीओं’विरुद्ध फौजदारी कारवाई करा;  जि. प. समाजकल्याण समितीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 15:09 IST

अकोला : वारंवार पत्र व्यवहार आणि सूचना देऊनही दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांचा कृती आराखडा अद्याप सादर केला नसल्याने, जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध (बीडीओ) फौजदारी कारवाई करण्याचा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्दे दलित वस्ती कामांचा आराखडा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे सादर करण्यात आला नाही.जिल्ह्यातील सातही गटविकास अधिकाºयांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा ठराव जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.

अकोला : वारंवार पत्र व्यवहार आणि सूचना देऊनही दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांचा कृती आराखडा अद्याप सादर केला नसल्याने, जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध (बीडीओ) फौजदारी कारवाई करण्याचा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्ह्यात दलित वस्तींमध्ये विकास कामे करण्यासाठी सन २०१८-१९ ते २०२२-२३ या वर्षातील कामांचा कृती आराखडा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाºयांकडून मागविण्यात आला होता. समाजकल्याण समितीसह जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने यासंदर्भात वारंवार सूचना देऊन व वारंवार लेखी पत्रव्यवहार करूनही, सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाºयांकडून अद्याप दलित वस्ती कामांचा आराखडा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे सादर करण्यात आला नाही. त्यामुळे दलित वस्ती कामांचा आराखडा सादर न करणाºया जिल्ह्यातील सातही गटविकास अधिकाºयांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा ठराव जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समितीच्या सभेला सदस्य सम्राट डोंगरदिवे, महादेव गवळे, निकिता रेड्डी, बाळकृष्ण बोंद्रे, पद्मावती भोसले, दीपिका अढाऊ, संजय आष्टीकर यांच्यासह प्रभारी समाजकल्याण अधिकारी योगेश जवादे उपस्थित होते.२५ कोटींच्या कामांना स्थगिती; अधिकाºयांवर कारवाईचा ठराव!दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील २५ कोटींच्या कामांना स्थगितीच्या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाºयांवरही फौजदारी कारवाई करण्याचा ठराव जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’नुसार कारवाई करा; ‘सीईओं’ना दिले पत्र!दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांचा कृती आराखडा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे सादर न करणाºया जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाºयांविरुद्ध (बीडीओ) ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ नुसार कारवाई करून, कामांचा आराखडा तातडीने मागविण्यात यावा, अशा मागणीचे पत्र समाजकल्याण सभापतींसह सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांना (सीईओ) दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद