शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
येमेनमध्ये केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी टाळणारे हे 94 वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा? जाणून घ्या
3
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
6
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
7
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
10
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
11
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
12
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
13
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
14
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
15
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
16
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
17
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
18
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
19
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
20
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मैत्रेयच्या दोन संचालकांसह शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 01:43 IST

५00 ते ६00 नागरिकांची फसवणूक झाल्याची शक्यता.

अकोला, दि. ३- मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आकर्षक योजनांचे आमिष दाखवून शहरातील शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली आणि मुदत पूर्ण होऊनही रक्कम परत केली नाही. दिलेले धनादेशही अनादरित झाले. फसवणूक झाल्यामुळे नागरिकांनी बुधवारी रात्री रामदासपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी रात्री ८.३0 वाजता कंपनीचे संचालक वर्षा मधुसूदन सत्पाळकर (रा. विरार), जनार्दन अरविंद परूळेकर (रा. वसई) आणि शाखा व्यवस्थापक अशोक बैस (रा. शेगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शहरातील मलकापूर येथील सुरेखा नगरात राहणारे प्रशांत रामदास मानेकर (४३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी काही वर्षांपूर्वी मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अकोला शाखा कार्यालयात चार विमा काढले होते. त्यासाठी त्यांनी कंपनीकडे १ लाख ८00 रुपये भरले होते. गुंतवणुकीच्या रकमेची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मैत्रेय कंपनी शाखा कार्यालयात संपर्क केला. कंपनीने त्यांना एक धनादेश दिला. हा धनादेश त्यांनी बँकेत वटविण्यासाठी नेला; परंतु धनादेश अनादरित झाला. त्यांनी कंपनीकडे याची तक्रार केल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यांनी कंपनीकडे रकमेची मागणी केली; परंतु कंपनीने त्यांना रक्कम परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मानेकर यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला. मैत्रेय प्रा. लि. कंपनीने शहरातील ५00 ते ६00 नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. नागरिकांना आकर्षक योजनांचे आमिष दाखविण्यात आले. नागरिकांनी कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर भरलेल्या रकमेची मुदत पूर्ण झाली. नागरिकांनी कंपनीकडे रकमेची मागणी केली; परंतु कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दिलेले धनादेशही वटले नाहीत. दरम्यान प्रशांत मानेकर यांच्यासोबतच शहरातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी मैत्रेय कंपनीने फसवणूक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार शहरात जवळपास ५00 ते ६00 च्यावर नागरिकांची कंपनीने फसवणूक केल्याचा अंदाज आहे. यादीनुसार रामदासपेठ पोलीस किती रुपयांनी नागरिकांची फसवणूक झाली, याची तपासणी करणार आहे. "मैत्रेय कंपनीने शहरातील शेकडो नागरिकांची फसवणूक केली. त्यानुसार कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आमच्याकडे फसवणूक झालेल्या ३00 जणांची यादी आहे. पोलीस निरीक्षक सुभाष माकोडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे."- दिलीप पोटभरेपोलीस उपनिरीक्षक