शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

घरकुल, शाळा इमारती, वाहनतळाचा मुद्दा गाजला!

By admin | Updated: July 4, 2017 02:36 IST

‘डीपीसी’सभा : वाहनतळाचा आराखडा सादर करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: एकामित्मक गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत घरकुल, जिल्ह्यातील शाळा इमारतींची दुरवस्था आणि अकोला श्हरातील वाहनतळाचा (पार्किंग) मुद्दा सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत चांगलाच गाजला. अकोला शहरात वाहनतळांसाठी जागा निश्चित करून आराखडा सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सभेत दिले.एकात्मिक गृह निर्माण प्रकल्पांतर्गत मूर्तिजापूरमध्ये बांधण्यात आलेल्या घरकुलांपैकी अनेक घरांना पावसाळ्यात गळती लागते, अनेक घरकुलांमध्ये विद्युत मीटर लावण्यात आले नसल्याचा मुद्दा आ. हरीश पिंपळे यांनी उपस्थित केला. तसेच जिल्ह्यात घरकुल मंजूर करण्यात आलेल्या अनेक लाभार्थींना अद्याप घरकुलांचा लाभ मिळाला नसल्याचा प्रश्न आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी सभेत उपस्थित केला. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिकस्त इमारतींचा प्रश्न समिती सदस्य ज्योत्स्ना चोरे व आ. बळीराम सिरस्कार यांनी सभेत उपस्थित केला. यासंदर्भात जिल्ह्यातील शाळा इमारतींची माहिती घेऊन, करावयाच्या सोयी-सुविधांचा आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. अकोला शहरात वाहतळाची व्यवस्था नाही आणि दुसरीकडे ‘टोइंग’ पथकांकडून होणाऱ्या कारवाईत सामान्य वाहनधारकांची पिळवणूक होत असल्याचा मुद्दा ज्योत्स्ना चोरे यांनी मांडला. तसेच शहरात वाहनतळांसाठी जागा निश्चित करून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आ. गोपीकिशन बाजोरिया केली. त्यानुषंगाने वाहनतळासाठी जागा निश्चित करून आराखडा सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिले. डाबकी रोड परिसरातील कॅनॉल रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी आ. गोपीकिशन बाजोरिया सभेत केली. आ. रणधीर सावरकर, प्रतिभा अवचार यांनी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांसंबंधी मुद्दा उपस्थित केला. तसेच सामजिक न्याय भवन, शेतकऱ्यांना कर्जवाटपाचा मुद्दाही प्रतिभा अवचार यांनी उपस्थित केला. ‘डिपीसी’च्या सभेला उपस्थित राहण्यास प्रारंभी माध्यमांच्या प्रतिनिधींना मनाई करण्यात आली. काही वेळानंतर मात्र पालकमंत्र्यांच्या सुचनेवरून त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला....तर सगळ्यांना घर देणार कसे - बाजोरियाएकात्मिक गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांचा अनेक लाभार्थींना अद्याप लाभ मिळाला नाही. दहा वर्षांपासून लाभार्थींना घरकुलांचा मिळत नसेल...तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वांना घर देण्याची घोषणा कशी केली जाते, असा सवाल आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी ‘डीपीसी’च्या सभेत उपस्थित केला.शहर ‘सीसी कॅमेऱ्या’च्या नियंत्रणात आणणार!अकोला शहरात ६६ ठिकाणी ‘सीसी कॅमेरे लावण्यात आले असून, आणखी सीसी कॅमेरे लावण्यासाठी निधीची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सभेत केली. त्यानुषंगाने यासंदर्भात आराखडा सादर करण्याचे निर्देश देत निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, संपूर्ण अकोला शहर सीसी कॅमेऱ्याच्या नियंत्रणात आणले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी दिली.‘मॅट’खरेदी; बॅडमिंटन कोर्टच्या निधी मंजुरीला सावरकर यांचा विरोध!जिल्हा नियोजन समितीच्या अनुपालन अहवाल मंजुरीच्या विषयावर नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत ‘डीपीसी’मार्फत सन २०१४-१५ मध्ये अकोला शहरात कबड्डी ‘मॅट’ खरेदीसाठी ६८ लाख रुपयांचा निधी आणि सन २०१६-१७ मध्ये बॅडमिंटन कोर्टसाठी ८६ लाख रुपयांचा निधी देण्यास ‘डीपीसी’ सभेत मंजुरी देण्यात आली; मात्र या विषयाला आपला विरोध असल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी सभेत सांगितले. त्यानुसार या विषयाला त्यांचा विरोध नोंदविण्यात आला.