शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक तालुक्यात अतिरिक्त ५० खाटांची सुविधा निर्माण करा! -  बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 10:14 IST

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० खाटांची तसेच महानगरपालिका क्षेत्रात १०० खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

अकोला : जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० खाटांची तसेच महानगरपालिका क्षेत्रात १०० खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार बच्चू कडू हे सध्या स्वत: कोरोनाबाधित असून, ते गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. सोमवारी त्यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व व प्रमुख अधिकाऱ्यांची मोबाइल कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना. कडू यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करणे अत्यावश्यक असून, त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या यंत्रणेमार्फत जादा ५० बेडची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. अकोला महानगरपालिका क्षेत्रात अकोला महानगरपालिकेतर्फे १०० बेडची जादा सुविधा उपलब्ध करण्यात यावी. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथील अतिदक्षता विभागातील बेडची संख्याही वाढविण्यात यावी, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.आरोग्य सुविधा कमी पडता कामा नये!जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत उपचार सुविधांमध्ये कमतरता भासू न देण्याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. जिल्ह्यात मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे तसेच अन्य प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असेही निर्देश ना. कडू यांनी दिले.

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAkolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या