शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये माती खाण्याची ‘क्रेझ’; मातीच्या पुड्यांची सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:38 IST

अकोला : ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी विकतची माती खात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देमातीमुळे फायदा होत असल्याचा चुकीचा संदेश गेल्याने विद्यार्थी खरेदी करून त्याचे सेवन करीत आहेत. एक रुपयाला असलेली ही मातीची पुडी शाळा परिसरातील किराणा दुकानांवर सर्रास मिळत असल्याचे चित्र आहे. दुसरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या मातीच्या पुड्यांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे.

अकोला : ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी विकतची माती खात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. या मातीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शाळा परिसरात असलेल्या किराणा दुकानांमध्ये सर्रास विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने याकडे लक्ष देऊन मातीची विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. पालक आणि शिक्षकांनी याविषयी सजग राहण्याची गरज आहे.ग्रामीण भागातील दुकानांमध्ये मातीच्या पुड्यांची सर्रास विक्री होत आहे. या मातीमुळे फायदा होत असल्याचा चुकीचा संदेश विद्यार्थ्यांमध्ये गेल्याने विद्यार्थी खरेदी करून त्याचे सेवन करीत आहेत. एक रुपयाला मिळत असलेली ही मातीची पुडी शाळा परिसरातील किराणा दुकानांवर सर्रास मिळत असल्याचे चित्र आहे. दुसरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या मातीच्या पुड्यांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या मातीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. मातीमधील केमिकलमुळे मुलांच्या तोंडात इन्फेक्शन होत असून, आतड्यांवरही परिणाम होत आहे. पिंजर परिसरात एका मुलीचा या मातीमुळेच मृत्यू झाल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत असलेल्या या मातीच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने बंदी घालण्याची मागणी होत आहे. या मातीची विक्री करणाºया दुकानदारांविरुद्धही कारवाईची गरज आहे. शालेय विद्यार्थी आपल्या दप्तरात मातीच्या पुड्या ठेवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देऊन तो मातीच्या आहारी गेला का, याची खातरजमा करून त्याला त्यापासून परावृत्त करण्याची गरज आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी मातीच्या पुड्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करीत आहेत. जवळपास ७० टक्के विद्यार्थी मातीचे सेवन करीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे शिक्षक आणि पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. मातीची विक्री करणाºया दुकानदारांवरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे.- दीपक सदाफळे, संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक, पिंजर.

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी